घरमहाराष्ट्रघरांवर तिरंगा फडकावून नागरिकत्व कायद्याला विरोध करा

घरांवर तिरंगा फडकावून नागरिकत्व कायद्याला विरोध करा

Subscribe

असदुद्दीन ओवैसींचे आवाहन

नागरिकत्व दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाने सभेचे आयोजन केले होते, या सभेत पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. तसेच उपस्थितांसह समस्त देशवासीयांना उद्देशून या कायद्याच्या विरोधात प्रत्यकाने आपल्या घराबाहेर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी ओवैसी म्हणाले की, नागरिकांनी आपल्या घराबाहेर तिरंगा ध्वज फडकावून या दोन्ही कायद्यांना विरोध दर्शवावा. लोकांवर गोळीबार केला जात आहे, हे चुकीचे आहे. मी केवळ नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामधून धर्म हटवण्याची मागणी करत आहे. तर नॅशनल पॉपुलेशन रजिस्टर व एनआरसी काळा कायदा आहे. पंतप्रधान मोदी यांना माहिती आहे की, आपली अर्थव्यवस्था खराब अवस्थेत आहे. मात्र ते जीडीपी आणि अर्थव्यवस्थेबद्दल बोलणार नाहीत.

- Advertisement -

आपल्या घरांवर तिरंगा असणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपासाठी संदेश असेल की, महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश आणि राज्यघटना अद्याप अस्तित्वात आहे. ही मुस्लिमांची लढाई नाही व या लढाईत एकटे मुस्लीम नाहीत. ही देशाला वाचवण्याची लढाई आहे. पंतप्रधान मोदी देशाला धर्माच्या नावावर चालवू इच्छित आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश येथून येणार्‍या लोकांना नागरिकत्व देण्याबद्दल आम्हाला अडचण नाही, मात्र हे केवळ धर्माच्या आधारावरच का? असा सवालही ओवैसी यांनी याप्रंसगी विचारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -