घरमहाराष्ट्रकोकणातील पाणी इतरत्र वळवण्यास विरोध राहील

कोकणातील पाणी इतरत्र वळवण्यास विरोध राहील

Subscribe

सुनील तटकरे यांचे प्रतिपादन

महाराष्ट्रातील दुष्काळी भागात कोकणातील पाणी नेण्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही ेदिवसांपूर्वी बोलून दाखवल्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील पाणी इतर ठिकाणी वळविण्यास आमचा विरोध आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण, रायगड किल्ल्याचा, जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात यावा, तसेच लोणारे येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश व्हावा, कोकण रेल्वेच्या वीर ते रत्नागिरी मार्गाचे दुपदरीकरण करावे, कोकणातील चार भारतरत्नांचे एकत्रित स्मारक व्हावे, आरसीएफच्या थळ प्रकल्पाचे विस्तारीकरण करणे या कामांना आपण प्रधान्य देणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी येथे सांगितले.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या 97 दिवसांतील खासदार म्हणून केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा तटकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडला. रायगड किल्ल्याचा जागतिक वारसा यादीस समावेश करण्यात यावा आणि रायगड जिल्ह्यात स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि पा. वा. काणे या चार भारतरत्नांचे स्मारक व्हावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली असून, भारत सरकारच्या पर्यटन विकास योजनेंतर्गत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात यावा यासाठी पर्यटन मंत्र्यांशी चर्चा केली आहे.

कोकणतील पाणी इतर ठिकाणी वळविण्यास आमचा विरोध आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात आणण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पाबाबत शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे प्रकल्प रायगडमध्येच येईल की नाही, याबाबत साशंकता आहे. तरीपण आपण या प्रकल्पाबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे तटकरे म्हणाले. प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार असेल तर प्रकल्पाला विरोध करेन, पण पर्यावरणाची हानी होणार नसेल सर्वांशी चर्चा करून निर्णय घेईन, असे तटकरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -