घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्येही प्रकल्पाला विरोध, टाटा सोलर विरोधात शेतकरी आक्रमक; काय आहे प्रकरण?

नाशिकमध्येही प्रकल्पाला विरोध, टाटा सोलर विरोधात शेतकरी आक्रमक; काय आहे प्रकरण?

Subscribe

नाशिक : शासनाने फार्मिंग सोसायटी मार्फत भूमिहिनांना कसण्यासाठी जमीन दिलेली असतांना सदर जमीनीवर टाटा सोलर कंपनीकडून प्रकल्प टाकण्यात येत आहे. मुळात ही जमीन शेतकर्‍यांना कसण्यासाठी दिली असतांना कंपनीकडून या जागेवर अतिक्रमण केले जात असल्याचा आरोप करत ही जमीन शेतकर्‍यांच्या नावावर करावी या मागणीसाठी किसान सभेच्या नेतृत्वात १५ मे पासून महसूल कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला देण्यात आला.

या निवेदनात म्हटले आहे की, नांदगाव तालुक्यातील साकोरे (पुनर्वसाहत पांझण) गट क्र. १ ही जमीन हि कसण्यासाठी शासनाने फार्मिंग सोसायटीमार्फत भूमिहीनांना दिली असतांना सदर जमिनीची सोलर कंपनी खरेदी कशी करू शकते? या सर्व प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे. फार्मिंग सोसायट्या अवसायनात निघाल्यावरती नांदगांव तहसीलदारांनी १९७९ साली संस्थेला दिलेली जमीन ताब्यात घेऊन सरकार नाव दाखल केले असे पत्र काढले आहे . याच जमिनीवर आम्ही भूमिहीनधारक अर्जदार गेले ३५ पेक्षा अधिक वर्षांपासून जमींन कसून उदरनिर्वाह करत आहोत. या कालावधीमध्ये वनविभागाने अतिक्रमण केले म्हणून दंड केलेला आहे.

- Advertisement -

भूमिहीन आहोत म्हणून आम्हाला जमीन कसण्यासाठी कायम स्वरूपी आमच्या नावावर व्हावी यासाठी शासनाशी वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे, मात्र अद्याप याची दखल शासनाने घेतली नाही व आज उदरनिर्वाहासाठी कसत असलेली शेत जमीन हि हिसकावण्याचा प्रयत्न सदर कंपनी करत आहे. यासंदर्भात तहसीलदारांना वारंवार निवेदन देण्यात येऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तरी त्वरित शासनाने वरील जमिन कसत असणार्‍यांच्या नावावर करावी या मागणीसाठी दि. १५ मे रोजी नाशिकरोड महसूल कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा किसान सभेच्यावतीने देण्यात आला. यावेळी राजू देसले, किसानसभा जिल्हाध्यक्ष देविदास भोपळे, उपाध्यक्ष प्रकाश भावसार, हनुमान आनंदा शिंदे, सचिन खैरनार, ताराबाई बोरसे, मधुकर बरफ, योगेश जाधव, सुभाष निकम,मीना हिरे, माणिक हिरे, तुकाराम सोनवणे, सचिन सुर्यवंशी, सुमन साळुंके, सर्जेराव मोरे, रमेश कदम आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -