घरमहाराष्ट्रअमरावतीत आतापर्यंत १८ लाख ७० हजारांची रोकड जप्त

अमरावतीत आतापर्यंत १८ लाख ७० हजारांची रोकड जप्त

Subscribe

अमरावती जिल्ह्यात दहा वेगवेगळ्या ठिकाणी १८ लाख ७० हजार ५७० रुपये रोख रक्कम जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. एकूण ३११० प्रकरणात निवडणूक प्रशासनाकडून कार्यवाही करुन साहित्य हटविण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात फिरते पथक आणि विविध यंत्रणांद्वारे काटेकोर तपासणी करण्यात येत असून, अमरावती जिल्ह्यात दहा वेगवेगळ्या ठिकाणी १८ लाख ७० हजार ५७० रुपये रोख रक्कम जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, आवेश महतीया आणि अलताफ महतीया यांच्याकडून शिंगणापूर फाट्यावर १ लक्ष १३ हजार २० रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बडनेरा चेकपोस्ट येथे मनोज फिलीप्स यांचेकडून ४ लाख २ हजार रोख रक्कम आणि श्रीकृष्ण धांदे यांच्या कडून दोन लाख रुपयांची रोख जप्त करण्यात आली आहे.

येवढी रक्कम जप्त

सुभाष चंदनखेडे यांच्याकडून अर्जुननगर चेकपोस्ट येथे एक लाख रूपये रक्कम जप्त करण्यात आली. चांदूर रेल्वेच्या सुचित लोया यांच्याकडून एसआरपीएफ चेकपोस्टनजिक तीन लाख २८ हजार पाचशे, मोहम्मद इस्माईल मोहम्मद साफी यांचेकडून एक लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. टाकळी दर्यापूर येथे हरीदास साहेबराव सोळंकी यांचेकडून ७१ हजार २०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तर कारला येथे शेगावचे प्रकाश गोयंका यांचेकडून दोन लाख ३० हजार रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच अचलपूर येथे जहिर खाँ जुम्मा खाँ, दगडू चव्हाण आणि नरेंद्र नैकेले यांच्या तपासणीत एक लाख ७५ हजार ८५० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. रिध्दपूर नाक्याजवळ दिलीप पाटील यांचेकडून एक लाखाची रोकड जप्त करण्यात आली. रोकड जप्तीच्या आठ प्रकरणात एसएसटी पथकाने तर दोन प्रकरणात एफएसटीने कार्यवाही केली आहे. सदरची रोकड ही कोषागार कार्यालयात आणि पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे.

- Advertisement -

निवडणूक प्रशासनाकडून कार्यवाही

लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यात आज पर्यंत १३५ दारू जप्तीच्या कारवाया झाल्या असून आचारसंहिता भंगाचे चार गुन्हे दाखल झाले आहेत. विविध विभागांसह जिल्हा प्रशासनाकडून अपप्रकार रोखण्यासाठी नियमित कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात काटेकोर पद्धतीने निवडणूक प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्ह्यात पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई सुरू आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयात आचारसंहिता कक्षाकडून सर्व यंत्रणेच्या समन्वयाची कार्यवाही होत आहे. दारुजप्ती कारवाईअंतर्गत एकूण१३५ गुन्हे दाखल करण्यात आले. यातील १३४ प्रकरणांत दारू जप्तीबाबत कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून, तर एक कारवाई अचलपूर येथील एसएसटीकडून करण्यात आली आहे. आचारसंहिता भंग प्रकरणात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिते अंतर्गत १९२७ पोस्टर्स,बॅनर्स,होर्डिग्स, ८७७ झेंडे तर ३०६ प्रकरणात मालमत्ता विद्रुपी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली असून एकूण ३११० प्रकरणात निवडणूक प्रशासनाकडून कार्यवाही करुन साहित्य हटविण्यात आले आहे. सी-व्हीजील ॲप अंतर्गत प्राप्त ३४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -