घरताज्या घडामोडीपंढरपूरची माघी यात्रा रद्द, त्रिस्तरीय नाकाबंदीचा निर्णय

पंढरपूरची माघी यात्रा रद्द, त्रिस्तरीय नाकाबंदीचा निर्णय

Subscribe

पंढरपूरची माघी यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोरोनाच्या सावटामुळे गेल्या वर्षी माघी यात्रा रद्द करण्यात आली होती. यंदाही पंढरपूरच्या माघी यात्रा रद्द करण्यात आली आहे. सोलापूरात त्रिस्तरीय नाकाबंदी करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षी माघी यात्रा, आषाढी एकादशी त्याचबरोबर कार्तिकी एकादशीही होऊ शकली नव्हती. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नसल्याने २९ फेब्रुवारी पर्यंत नियम तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पंढरपूरची माघी यात्रा आता भरवण्यास मनाई करण्यात आली आहे. २३ फेब्रुवारी रोजी ही माघी यात्रा होणार होती. वारकरी संप्रदाय येणाऱ्या माघी यात्रेसाठी मोठी तयारी करत होते. मात्र भाविकांशिवाय यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. २२ आणि २३ फेब्रुवारीला पंढरपूर विठ्ठल मंदिकर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या भागात मंदिर परिसर, चंद्रभागेचे वाळवंट आणि प्रदक्षिणा मार्गावार संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे.

माघी यात्रेला महाराष्ट्राच्या विविध भागातून वारकरी संप्रदाय दिंडी, पालखी घेऊन येत असतात. कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नाही. भाविकांच्या वाढत्या गर्दीने कोरोनाचा अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये कोरोनावर मात करण्यात यश आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने सोलापूर कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे आता या काळात कोरोनाचे सर्व नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे.

- Advertisement -

पंढरपूर तालुका प्रवेश मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात विचार सुरु आहे. प्रथा परंपरा निदान मर्यादित भाविकांच्या उपस्थित व्हाव्यात अशी अपेक्षा वारकरी संप्रदायाकडून व्यक्त करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या अपेक्षेवर शासन काय निर्णय घेणार याकडे वारकरी संप्रदायाचे लक्ष आहे.


हेही वाचा – पुणे ते नागपूर धावणार त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -