घरताज्या घडामोडीगोपीनाथ गडावर येण्यापेक्षा गड सर्वसामान्यांपर्यंत न्या, पंकजा मुंडेंकडून गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त संकल्प...

गोपीनाथ गडावर येण्यापेक्षा गड सर्वसामान्यांपर्यंत न्या, पंकजा मुंडेंकडून गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त संकल्प जाहीर

Subscribe

भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त संकल्प जाहीर केला आहे. गोपीनाथ मुंडे जयंती सेवेसाठी समर्पित केली असल्याचे सांगत आजचा दिवस हा सेवा यज्ञ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. राज्यातील शेतकरी, मजूर, शेतमजूर आणि ऊस कामगार यांच्यापर्यंत गोपीनाथ गड घेऊन जाण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. यानंतर पंकजा मुंडे स्वतः ऊस कामगारांसोबत श्रमदान करण्यासाठी जाणार आहेत. तसेच रक्तदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस सेवेसाठी, सेवा यज्ञासाठी समर्पित केला आहे. आम्ही सेवेचा संकल्प केला आहे. गोपीनाथ गडावर देशाचे सर्व मान्यवर येऊन गेले आहेत. पक्षाचा कोणताही भेदभाव नाही. कोणताही नेता इथे आला तर गोपीनाथ मुंडेंचा आशीर्वाद घेतो कारण गोपीनाथ मुंडेंनी सगळ्या जाती आणि धर्माशी संबंध निर्माण केले आहेत असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

- Advertisement -

गोपीनाथ गड शेतातील मजूरापर्यंत न्या

गोपीनाथ मुंडे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी गोपीनाथ गडावर नेते आणि मान्यवर येत असतात. सर्वसामान्यांपासून ते नेते मंडळींपर्यंत सगळी लोकं गोपीनाथ गडावर येत असतात. पण लोकांनी गोपीनाथ गडावर येण्याची आवश्यकता नाही आहे. इथे येण्यापेक्षा गोपीनाथ गड हा सर्वसामन्यांपर्यंत न्या, एखाद्या वीट भट्टी कामगारापर्यंत न्या, एखाद्या शेतमजूरापर्यंत न्या, कामगारापर्यंत न्या, ऊसतोड कामगार, रस्त्यावर खडी फोडणाऱ्या मजूरापर्यंत न्या हा गोपीनाथ गड सामान्य माणसापर्यंत नेण्याचा संकल्प करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पंकजा मुंडेंनी जाहीर केलं आहे.

मी स्वतः ऊस कामागारांच्या सोबत ऊसाच्या फडात जाणार

मी स्वतः ऊस कामागारांच्या सोबत ऊसाच्या फडात जाणार आहे. ते कामगार कसे ऊस तोडतात, कसे डोक्यावर ओझे वाहतात हे सगळं पाहणार आहे. खासदार प्रीतम मुंडे वीट भट्टी कामगारांसोबत जाणार आहे. त्यानंतर रक्तदान देखील करणार आहेत. सेवेचा संकल्प आम्ही केला आहे. महाआरोग्य शिबीरात मोठ्या प्रमाणात लोकांना उपचार दिले आहेत. गरीब शेतकऱ्यांना मदत केली आहे. सामुदायिक विवाह सोहळा घेतला. कोविड सेवा यज्ञाच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरु केलं होते. कोरोना काळात ज्यांच्या चुली विझल्या त्यांना मोफत जेवण पुरवले. अनाथ लोकांना दत्तक घेऊन त्यांची सेवा करण्याचे काम केले असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा : Gopinath Munde : मुंडेसाहेब अन् बाळासाहेब असते तर… पंकजा मुंडे म्हणाल्या भविष्यात युतीचा…


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -