घरताज्या घडामोडीMHADA Exam: म्हाडा पेपर फूटी प्रकरणात पुण्यातील तीन आरोपींना अटक

MHADA Exam: म्हाडा पेपर फूटी प्रकरणात पुण्यातील तीन आरोपींना अटक

Subscribe

म्हाडा परीक्षेचे पेपर मोठ्या रकमेला विकले जाणार होते

आज राज्यात होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षा पेपर फुटीच्या संशयावरुन अचानक रद्द करण्यात आल्या. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली. दरम्यान म्हाडा पेपर फूटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली आहे. पेपर फूटी प्रकरणातील महत्त्वाचे तीन मासे पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश येणार आहे. प्रितीश देशमुख, संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ अशी आरोपींची नावे आहेत. यातील पहिला आरोपी हा जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीतील मॅनेजर असून उर्वरित दोन जण एजंट आहेत. गेली अनेक दिवस तिघे पेपर फोडण्याची तयारी करत होते. शेवटी पुणे सायबर पोलिसांनी शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तिघांनाही विश्रांतवाडी येथून ताब्यात घेतले.

मोठ्या रकमेला पेपर विकले जाणार होते

म्हाडा परीक्षेचे पेपर फुटण्याची पूरेपूर तयारी या तिघांनी करुन ठेवली होती. पुणे सायबर पोलीस तिघांकडे बारीक लक्ष ठेवून होते. जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीचा मॅनेजर प्रितीश देशमुख आणि त्याचे दोन एजंट रात्री विश्रांतवाडी येथे पेपर देण्यासाठी आले होते. हा पेपर मोठ्या रकमेका विकला जाणार होता. मात्र पुणे सायबर पोलीस वेळेत तिथे पोहचून  तिघांना रंगे हात पकडले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून तिघांची कसून चौकशी सुरू आहे. पेपर फोडण्यामागचा नेमका सुत्रधार कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisement -

पुणे पोलिसांनी शनिवारी रात्री या तीन आरोपींना रंगे हात पकडल्याने आज होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षा अचानक रद्द कराव्या लागल्या. परीक्षा रद्द केल्याने अनेक विद्यार्थ्यांचे हाल झालेत. विद्यार्थ्यांना आता परीक्षा देण्यासाठी जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. परीक्षासंदर्भातील माहिती लवकरच विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.


हेही वाचा – MHADA Exam Postpon: आज होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षा रद्द! विद्यार्थ्यांना जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -