घरताज्या घडामोडीGopinath Munde : मुंडेसाहेब अन् बाळासाहेब असते तर... पंकजा मुंडे म्हणाल्या भविष्यात...

Gopinath Munde : मुंडेसाहेब अन् बाळासाहेब असते तर… पंकजा मुंडे म्हणाल्या भविष्यात युतीचा…

Subscribe

गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेण्यात  आले. प्रत्येकवेळी कार्यकर्त्यांना गडावर बोलावण्यापेक्षा यंदा आम्हीच कार्यकर्त्यांपर्यंत पोहण्याचे उदिष्ट ठेवले आहे. त्यामध्ये रक्तदान आणि कोरोनाविरोधी लसीकरण यासारख्या अनेक उपक्रमांचाही समावेश आहे. प्रितम मुंडे वीटभट्टी कामगारांमध्ये गोपिनाथ मुंडे साहेबांची जयंती साजरी करतील, तर मी स्वतः ऊसतोड कामगारांसोबत जयंती साजरी करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. याचवेळी शिवसेनेसोबतची भविष्यातील युतीचा सकारात्मक विचार आणि ओबीसी आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाचीही त्यांनी मागणी केली.

भविष्यात युतीचा विचार…

महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ८० च्या दशकातच ठरली होती. शिवसेना खासदार गोपिनाथ मुंडे साहेबांबद्दल बोलले त्यासाठीचा आनंद आम्हाला आहेच. पण आज जर गोपिनाथ मुंडे आणि बाळासाहेब असते तर नक्कीच चित्र वेगळे असते. संजय राऊतांकडून युतीबाबत वारंवार संकेत दिले जात आहेत. त्यामुळेच भविष्यात सकारात्मकतेने विचार करायला हरकत नाही, असेही मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मांडले. गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. याचवेळी शिवसेनेसोबतची भविष्यातील युतीचा सकारात्मक विचार आणि ओबीसी आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाचीही त्यांनी मागणी केली.

- Advertisement -

भुजबळांनी ओबीसी आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवावे

महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाची परिस्थिती अतिशय गंभीर बनत चालली आहे. हा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. एका संपुर्ण समुदायाचे भविष्य या आरक्षणाच्या निर्णयावर आहे. त्यामुळे हा प्रश्न आता केवळ राजकीय नव्हे तर अस्तित्वाच्या लढाईचा झाला आहे. म्हणूनच ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर आम्ही छगन भुजबळ साहेबांनाही साथ द्यायला तयार आहोत. ओबीसी आरक्षणासह निवडणूका व्हाव्यात या भुजबळांच्या भूमिकेला आमचीही साथ आहे. सध्या प्रश्न हा
इम्पेरिकल डेटाबाबतचा आहे. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणावर विशेष अधिवेशन भरवण्यासाठीही आम्ही त्यांची साथ देऊ. राज्याच्या इतिहासात एतिहासिक असे अधिवेशन यानिमित्ताने नोंदवले जाईल असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे भुजबळांनी जे आवाहन केले आहे. त्याला आम्ही साथ देऊ.


गोपीनाथ मुंडे असते तर युती कायम राहिली असती, शिवसेना त्यांनाच कळली – संजय राऊत

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -