घरमहाराष्ट्रनागपाड्यात इमारतीचा भाग कोसळला

नागपाड्यात इमारतीचा भाग कोसळला

Subscribe

ढिगार्‍याखाली चारजण जखमी

महाड येथील इमारत दुर्घटनेची घटना ताजी असतानाच आता नागपाड्यातही गुरुवारी दुपारी इमारतीचा भाग कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. इमारतीच्या ढिगार्‍याखाली तीन ते चारजण अडकल्यानेे ते जखमी झाले. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले होते. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

नागपाड्यातील शुक्लाजी मार्गावरील आयेशा कंपाऊंडमध्ये मिश्रा बिल्डिंग आहे. ही इमारत तळमजला अधिक दुमजली आहे. या इमारतीच्या शौचालयाचा काही भाग कोसळल्याने तीन ते चार जण या ढिगार्‍याखाली अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या, पोलीस, रुग्णवाहिका आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले होते. त्यातच दुपारी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे ढिगारा उपसण्याच्या कामात अडथळा येत होता. मात्र, पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. पावसामुळे या परिसरात चिखल झाल्याने आणि अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी ही इमारत असल्यानेही मदतकार्यात अडथळे येत होते.

- Advertisement -

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ही इमारत जुनी असून धोकादायक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -