घरदेश-विदेशड्रग्ज देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; वेश्याव्यवसायातही ढकलले

ड्रग्ज देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; वेश्याव्यवसायातही ढकलले

Subscribe

उत्तर प्रदेश गेले काही दिवस बलात्कार, खून, अपहरण अशा अनेक गुन्ह्यांमुळे चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधील वाराणसीहून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. वाराणसीतील रामनगर भागात एका १५ वर्षाच्या मुलीला ड्रग्ज देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिला वेश्याव्यवसायात ढकलले.

पीडित मुलगी त्यांच्या तावडीतून सुटली आणि १६ ऑगस्टच्या रात्री ती पोलिसांकडे गेली आणि सर्व माहिती पोलिसांना दिली. रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मिर्झापूरमधील चुनार भागातील रहिवासी आहे. तिने पोलिसांना सांगितले की, १५ जून रोजी एका महिलेने तिला आपल्या गावातून ब्युटी पार्लरमध्ये काम करण्यासाठी वाराणसीला नेले. पीडित मुलीने काही दिवस तिथे काम केले. त्यानंतर १५ दिवसांनी पार्लरच्या मालकाने तिला ड्रग्स देण्यास सुरवात केली आणि नंतर तिला वेश्याव्यवसायात ढकलले. तिने पोलिसांना सांगितले की पार्लरच्या मालकाने तिला आधी त्याच्या घरी ठेवले. तिथे उपस्थित असलेल्या युवकाने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर डझनभर लोकांनी बलात्कार केला.

- Advertisement -

पीडित मुलीने दिलेल्या माहितीनंतर रामनगर पोलिसांनी चुनार पोलिसांकडे संपर्क साधला. चुनार पोलिसांनी सांगितले की त्यांनी १२ जुलै रोजी मुलगी हरवलेल्याची नोंद देखील केली होती. यासंदर्भात चुनार पोलिसांनीही एफआयआर नोंदविला आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, मुलीला चुनार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पीडित मुलीने दिलेल्या जबाबात पीडितेने तिचे शोषण करणार्‍या ३ महिलांसह १२ जणांची नावे दिली आहेत. पीडितेच्या जबाबाच्या आधारे आरोपीविरूद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींचा शोध सुरू केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -