घरमहाराष्ट्रParth Pawar : उपमुख्यमंत्री पवारांच्या पुत्राला वाय प्लस सुरक्षा, राज्य सरकारचा निर्णय

Parth Pawar : उपमुख्यमंत्री पवारांच्या पुत्राला वाय प्लस सुरक्षा, राज्य सरकारचा निर्णय

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे देखील प्रचाराच्या रिंगणात उतरणार असल्याने यासाठी त्यांना आता वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्य सरकाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय नेत्यांकडून आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवारला बारामती लोकसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. ज्यामुळे पहिल्यांदाच पवार कुटुंबियांमध्येच ही लढत पाहायला मिळणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या कुटुंबियांसह महायुतीचे सर्वच उमेदवार बारामतीत येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे देखील प्रचाराच्या रिंगणात उतरणार असल्याने यासाठी त्यांना आता वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. (Partha Pawar has been granted Y Plus security by the state government)

राज्य सरकारने चार दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. जो निर्णय आज जाहीर करण्यात आला. पार्थ पवार आईच्या अर्थात सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ बारामती लोकसभा मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. इतकेच नाही, तर त्यांनी प्रचारसभा घेण्यास देखील सुरुवात केली आहे. ज्यामुळे राज्य सरकारने पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : नाशिकचा तिढा सुटता सुटेना; भुजबळ म्हणतात, राष्ट्रवादीचा दावा आजही कायम

पुणे पोलिसांकडून काही दिवसांपूर्वी महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. पण त्यानंतर आता थेट उपमुख्यमंत्र्याच्या मुलाकडे कोणतेही पद नसताना पण ते केवळ उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असल्याने त्यांना ही सुरक्षा पुरवण्यात आल्याने याबाबत अनेक प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत. त्यामुळे आता पार्थ पवार हे कुठेही जाताना किंवा सभा घेताना त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. याबाबत आता विरोधकांकडून कोणती टीका किंवा मत व्यक्त करण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव असलेले पार्थ पवार यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकींआधी राजकारणात पदार्पण केले. लहानपणापासूनच राजकारणाचे धडे मिळालेल्या पार्थ पवार यांनी कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका न लढवता मावळ लोकसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पण शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पण आता त्याच बारणेंच्या प्रचारासाठी पुण्यात फिरणार आहेत. पार्थ पवार हे उच्च शिक्षित असून त्यांनी मुंबईच्या एचआर महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे. पुढील शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले होते.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : हा तर भाजप पुरस्कृत…; ठाकरे गटाचा निवडणूक आयोगाला टोला


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -