घरमहाराष्ट्रपेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई

पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई

Subscribe

शिरीष धारकर आणि प्रविण कुमार या दोघांनी १२८ बोगस कर्ज खात्याद्वारे जवळपास साडेसातशे कोटीहून अधिक रकमेची लूट केली होती. ८ वर्षापूर्वीच्या या घोटाळा प्रकरणात ईडीने दोन जणांना अटक केली आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मनी लॉड्रिंगप्रकरणी पेण अर्बन सहकारी बँकेच्या माजी अध्यक्ष आणि माजी संचालकांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालयाने या दोघांवर अटकेची कारवाई केली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष शिशिर धारकर आणि प्रविणकुमार शर्मा यांना अटक केली आहे. बँक घोटाळा प्रकरणी शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळ्याचा फटका पेण अर्बन बँकेच्या जवळपास अडीच लाख ठेवीदारांना बसला आहे.

साडेसातशे कोटींची लूट

पेण अर्बन सहकारी बँकेत आठ वर्षांपूर्वी घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. पेण अर्बन बँकेमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी नेमलेल्या विशेष लेखा परीक्षण पथकाने १२८ खाती बोगस असल्याचे सांगितले होते. शिरीष धारकर आणि प्रविण कुमार या दोघांनी १२८ बोगस कर्ज खात्याद्वारे जवळपास साडेसातशे कोटीहून अधिक रकमेची लूट केली.

- Advertisement -

घोटाळेचे मुख्य सुत्रधार

या घोटाळा प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालयाने तपास करण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणामध्ये शिशिर धारकर आणि प्रविणकुमार हे या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असल्याचे चौकशीतून समोर आले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने दोघांवर अटकेची कारवाई केली. शुक्रवारी रात्री दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -