घरमहाराष्ट्रनक्षलवाद्यांनी केली वाहनांची जाळपोळ

नक्षलवाद्यांनी केली वाहनांची जाळपोळ

Subscribe

गडचिरोली येथील एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली आहे. तालुक्यातील वाहनांना जाळण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलीहल्ल्याच्या घटना अजूनही सुरु आहे. पोलिसांकडून नक्षलवाद्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा बदला घेण्यासाठी तालूक्यातील वाहने जाळली. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात ४० नक्सलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर नक्षलवादी चळवळीचे कंबरडे मोडले होते. या कारवाईनंतर नक्सल कारवाया थंडावल्या होत्या. मात्र काल रात्री एटापल्ली तालुक्यात येत असलेल्या हालेवारा-गट्टेपल्ली मार्गावर रोडच्या कामावरील १० जे.सी.बी, ८ ट्रॅक्टर व एका पिकअपची जाळपोळ केली आहे. एकंदरीत या कामावरील जाळपोळीतील नुकसानीची किंमत ३ कोटीच्या आसपास असल्याचा अंदाज आहे.

वाहने दिले पेटवून

काल रात्री सशस्त्र नक्सली हलेवारा-गततेपल्ली मार्गावर प्रधान मंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत सुरू असलेल्या रोडच्या कामावर आले. मजूर व दिवानजीला धमकवुन काम बंद पाडले व नंतर ट्रॅक्टर व जे.सी.बी मधील डिझेल टॅंक फोडून वाहने पेटवून दिले. यानंतर या प्रकाराची वाच्यता होऊ नये या साठी मजुरांना कामावरून जाऊ दिले नाही आज सकाळच्या सुमारास मजूर घरी परतल्यानंतर ही बाब उजेडात आली. छत्तीसगड निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा दिला असतानंही ठेकेदाराने खबरदारी न घेतल्याने एवढ्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. एप्रिल महिन्याच्या मोठ्या कारवाईनानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहन जाळपोळीची ही पहिलीच घटना आहे त्यामुळे नक्सल चळवळ पुन्हा डोके वर काढते काय?? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -