घरदेश-विदेशPetrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत कहीं खुशी कहीं गम; महाराष्ट्रात...

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत कहीं खुशी कहीं गम; महाराष्ट्रात…

Subscribe

नवी दिल्ली: महिला दिवस 2024 च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता पेट्रोल-डिझेलच्या किंमतीसंदर्भात माहिती समोर आली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार काही राज्यांतील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे, तर काही राज्यातील नागरिकांसाठी निराशाजनक बातमी आहे. (Petrol Diesel Price Kahi Khushi Kahi Gum about petrol diesel price In Maharashtra)

आंध्र प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर आसाम, बिहार, गुजरात, झारखंड आणि केरळसह काही राज्यांमध्ये इंधनाच्या किंमती कमी झाल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दर जैसे थे स्थिर आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या किंमतीत एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली. त्यामुळे ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 81.90 डॉलरवर बंद झालं. मात्र, या घसरणीचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर फारसा परिणाम होत नाही. तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती. आंध्र प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसह काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 0.80 पैशांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर आसाम, बिहार, गुजरात, झारखंड आणि केरळसह काही राज्यांमध्ये इंधनाचे दर कमी झाले आहेत.

  • दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
  • मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.
  • कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.
  • चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.73 रुपये आणि डिझेलचा दर 94.33 रुपये प्रति लिटर आहे.

(हेही वाचा: Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्षांनी सरळ मनमानी केली आणि…; ठाकरे गटाची टीका)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -