डोंबिवली : अन्न, वस्त्र, निवारा यांसह आता मोबाईलही संगळ्यांचा अयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. लहानांपासून ते अगदी वयोवृद्ध ही मोबाईलचा प्रचंड वापर करताना पाहायला मिळतात. विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्षात न भेटता लांबून संपर्क साधणेही या मोबाईलमुळे सहज शक्य झाले आहे. पण याच मोबाईलवरून आता एका पती-पत्नीमध्ये वाद झाला असून या वादाचे रुपांतर जीवघेण्या हल्ल्यापर्यंत झाले. पत्नी सातत्याने फोनवर बोलते म्हणून पतीने तिच्यावर चाकूने हल्ला केला. हा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. (Phone Call Fight Angry Husband Attacked On Wife With Knife In Dombivali)
मिळालेल्या माहितीनुसार, राजू शामुवेल हिवाळे (53) असे पतीचे नाव असून सुरेखा हिवाळे (47) असे पत्नी नाव आहे. सुरेखा ही सातत्याने फोनवर बोलते (Phone Call Fight) म्हणून पती राजू हिवाळे याने तिच्यावर चाकूने हल्ला करत तिला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सुरेखा ही जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीवर हल्ला केल्यानंतर राजू हिवाळे हा तेथून फरार झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास करत राजू हिवाळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा – Crime News: क्रिकेट खेळण्यावरून चाकू हल्ला; तुफान हाणामारीत एकाचा मृत्यू तर सहा जखमी
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील नांदिवली टेकडी परिसरात असलेल्या एका सोसायटीत हा प्रकार घडला. या सोसायटीमध्ये राजू आणि सुरेखा हे राहत होते. त्यावेळी पत्नी सातत्याने मोबाईलवर अन्य कोणाशी तरी बोलत असते याबाबत पती राजूच्या मनात राग होता. यावरून त्यांच्यात अनेकदा वादसुद्धा झाले होते.
नेमकी घटना काय?
रविवारी सुट्टी असल्याने हिवाळे यांची मुलं बाहेर गेली होती. मात्र ही मुलं घरी येताच त्यांनी आईला (सुरेखा) जेवणास विचारले, त्यावेळी आईने त्या मुलांना जेवणास नकार दिला. यावरून पती राजू आणि पत्नी सुरेखा यांच्यात वाद झाला. त्यावेळी मुलांनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला. मात्र मध्यरात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी राग असलेल्या राजूने धारदार चाकूने सुरेखावर हल्ला करत तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सगळे जागे होताच राजूने तेथून पळ काढला. याप्रकरणी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस फरार आरोपी राजू याचा शोध घेत आहेत. तसेच, जखमी सुरेखा हिच्यावर सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Phone Call Fight
हेही वाचा – Mumbai Local : लोकलमध्ये 15 वर्षीय मुलीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत