घरताज्या घडामोडीCoronavirus - प्रवासी शिंकला; पायलटने मारली विमानातून उडी!

Coronavirus – प्रवासी शिंकला; पायलटने मारली विमानातून उडी!

Subscribe

एअर एशियाची फ्लाइट I5-732 मध्ये ही घटना घडली. हे विमान दिल्लीसाठी निघालं होतं.

करोना विषाणूने जगभरात हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. या करोनाचा धसका सगळ्यांनीच घेतला आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यामध्ये करोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत. त्यामुळे सध्या विषेश काळजी या शहरांमध्ये घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये बाईक वरून जाणाऱ्या जोडप्याने एक व्यक्ती शिंकला म्हणून त्याला चांगलाच चोप दिला. असाच काहीसा प्रकार पुण्यातील एअरपोर्टवर घडला आहे. विमान उड्डाणाच्या तयारीत असतानाच एक प्रवासी शिंकला. त्यामुळे घाबरलेल्या पायलटने कॉकपिटमधून उडी मारली. २० मार्चला ही घटना घडली.

करोना विषाणूचा धसका सर्वांनीच घेतला आहे. पुण्यातील एअरपोर्टवर विमान उड्डाणाच्या तयारीत असतानाच एक प्रवासी शिंकला. त्यामुळे घाबरलेल्या पायलटने कॉकपिटमधून जोरात उडी मारली आणि जीवाच्या भीतीने हा पायलट दूरवर पळून गेल्याची घटना घडली आहे. एअर एशियाची फ्लाइट I5-732 मध्ये ही घटना घडली. हे विमान दिल्लीसाठी रवाना होणार होतं.

- Advertisement -

विमान उडायच्या तयारीत असताना पुढच्या रांगेत बसलेल्या एका प्रवाशाने अचानक शिंकण्यास सुरूवात केली. त्यामुळे इतर प्रवासीही घाबरले. पायलटला हा प्रकार समजताच त्याने तात्काळ कॉकपिटमधून उडी घेतली. तर विमानातील इतर क्रू मेंबर्सनी विमानाचा मागचा दरवाजा उघडला आणि इतर प्रवाशांना बाहेर काढले. केवळ शिंकणाऱ्या या व्यक्तिसाठीच पुढचा दरवाजा उघडण्यात आला होता. त्यानंतर विमानतळावर या सर्व प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात आली असून या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -