घरताज्या घडामोडीPM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, NIAच्या मुंबई ब्रँचमध्ये...

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, NIAच्या मुंबई ब्रँचमध्ये धमकीचा ईमेल

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. NIAच्या मुंबई ब्रँचमध्ये धमकीचा मेल आल्याची माहिती गुप्ततर विभागातील सूत्रांनी दिलीय. धमकीच्या मेलचा अधिक तपास करण्यात येत आहे. या मेलमध्ये नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच या कटाचा पर्दाफाश होऊ नये, यासाठी आपण आत्महत्या करत आहोत, असंही ईमेल करणाऱ्याने म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी २० स्लीपर सेल तयार आहेत. त्यांच्याकडे एकूण २० किलो आरडीएक्स आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर सेलकडून २० किलो आरडीएक्सच्या सहाय्याने मोदींना मारण्याचा कट रचला जात होता. मोदींच्या हत्येचा कटासंदर्भातील ई-मेलचा स्त्रोत काय आहे, याची माहिती संरक्षण संस्था मिळवत आहे. या मेलमध्ये किती तथ्य आहे आणि ते कुठून पाठवले आहे, याचा तपास सुरू आहे.

- Advertisement -

नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे ई-मेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. तसेच एनआयएने या मेलची माहिती इतर सुरक्षा यंत्रणांनाही पाठवली आहे. याआधीही अनेकवेळा नरेंद्र मोदींना मारण्याची योजना असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा डाव उधळला गेला होता.

दरम्यान , ज्या व्यक्तीकडून हा मेल लिहिण्यात आला आहे. त्याचे अनेक दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे मेलमध्ये म्हणण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने हा धमकीचा ई-मेल गुप्तचर आणि सुरक्ष यंत्रणांनाही पाठवला आहे. ज्या ईमेल आयडीवरून हा मेल आला. त्याची तपासणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : सतिश उकेंच्या आडून मला आणि काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र – नाना पटोले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -