घरमहाराष्ट्रशहापूरच्या सोगावमधील अंगणवाडीतील मुलांना टॉनिकमधून विषबाधा

शहापूरच्या सोगावमधील अंगणवाडीतील मुलांना टॉनिकमधून विषबाधा

Subscribe

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील किन्हवलीजवळील सोगाव येथे अंगणवाडीतील १३ मुलांना रक्तवाढीसाठी देण्यात आलेल्या टॉनिकचा डोस पाजल्याने उलट्या-जुलाबाचा त्रास झाल्याची घटना घडली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील किन्हवलीजवळील सोगाव येथे अंगणवाडीतील १३ मुलांना रक्तवाढीसाठी देण्यात आलेल्या टॉनिकचा डोस पाजल्याने उलट्या-जुलाबाचा त्रास झाल्याची घटना घडली आहे. यातील ६ मुलांना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून काही मुलांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तालुक्यातील सोगाव येथील अंगणवाडीतील शून्य ते सहा वर्ष वयोगटातील १३  मुलांना आयर्न फोलिक असिड टॉनिकचा डोस पाजल्याने उलटी आणि मळमळ होण्यास सुरुवात झाली. या मुलांना टाकीपठार आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. मात्र त्यांनतर घरी पुन्हा या मुलांना उलट्या व जुलाब होऊ लागल्याने या मुलांना प्राथमिक उपचार म्हणून किन्हवली हॉस्पिटलमध्ये तसेच शहापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते. प्राथमिक अंदाजानुसार औषधाचा जादा डोस दिल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगितले जात आहे.

सोगाव येथे रक्तवाढीसाठी दिलेल्या टॉनिकमधून विषबाधा झाल्याची घटना खरी असून सदर टॉनिकच्या बाटलीतील औषधं खराब होती का किंवा ते टॉनिक मुलांना जास्त प्रमाणात दिले गेले आहे का, याची सखोल चौकशी केली जाणार आहे.

– डॉ. तरुलता धानके, आरोग्य अधिकारी, शहापूर तालुका 

shahapur
अंगणवाडीतील मुलं उपचार घेताना
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -