घरमहाराष्ट्रसांगलीत पोलिसाची निर्घृण हत्या सीसीटीव्हीत कैद

सांगलीत पोलिसाची निर्घृण हत्या सीसीटीव्हीत कैद

Subscribe

सांगलीमध्ये किरकोळ वादातून एका वाहतूक पोलिसाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री सांगलीच्या रत्ना हॉटेलसमोर ही घटना घडली आहे. धारधार शस्त्राने १८ वार करुन पोलिसांची हत्या करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सांगलीमध्ये वाहतूक पोलिसांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. किरकोळ वादातून धारधार शस्त्राने १८ वार करुन वाहतूक पोलिसाची हत्या करण्यात आली आहे. समाधान मानटे असं हत्या झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. सांगलीच्या सह्याद्रीनगरच्या रत्ना हॉटेलसमोर मध्यरात्री हा सर्व प्रकार घडला आहे. या घटनेनंतर सांगली पोलीस दलात खळबळ पसरली आहे.

किरकोळ वादातून पोलिसाची हत्या

सांगलीच्या पोलीस दलामध्ये वाहतूक पोलीस पदावर कार्यरत असलेल्या समाधान मानटे या पोलिसाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. किरकोळ कारणातून झालेल्या वादातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सांगली पोलीस लाईनजवळच्या हॉटेल रत्नासमोर मध्यरात्री त्यांची हत्या करण्यात आली आहे. ही सर्व घटना हॉलेटच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामध्ये एक व्यक्ती त्यांच्यावर हल्ला करताना दिसत आहे.

- Advertisement -

हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

मंगळवारी रात्री समाधान मानटे ड्युटी संपवून घरी परतत असताना ते रत्ना हॉटेलमध्ये दारु पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी दारु पिताना दोन ग्राहकांशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर ते हॉटेलच्या आवारात हॉटेल व्यवस्थापकाशी बोलत होते. दरम्यान वाद झालेल्या व्यक्तीने गाडीतून धारधार हत्यार घेऊन आला आणि त्याने समाधान यांच्यावर सपासप १८ वार केले. या हल्ल्यामध्ये समाधान यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला.

आरोपीला ठोकल्या बेड्या

या घटनेची माहिती मिळताच संजयनगर, विश्रामबाग, सांगली शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. याप्रकरणी सांगलीच्या संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले असून त्या आधारे तपास सुरु आहे. रत्ना हॉटेलमधील व्यवस्थापकसह चार कामगारांची पोलिसांनी चौकशी केली आहे. दरम्यान एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्या चौकशीनंतर हत्येचे नेकमे कारण काय ते स्पष्ट होईल.

- Advertisement -

Man killed police in sangli caught on CCTV

सांगलीमध्ये पोलिसाला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यूसांगलीमध्ये एका पोलिसाला जबरदस्त मारहाण करण्यात आली असून त्यात त्या पोलिसाचा मृत्यू झाला आहे

Posted by My Mahanagar on Wednesday, 18 July 2018

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -