घरमहाराष्ट्रपोलिस वऱ्हाडी होऊन आले; लग्नात जेवलेही आणि नंतर असे घडले...

पोलिस वऱ्हाडी होऊन आले; लग्नात जेवलेही आणि नंतर असे घडले…

Subscribe

तेथील नातेवाईकांनी पोलिसांना हटकले तेव्हा, आम्ही मुलीकडील वऱ्हाडी असल्याचे अधिकाऱ्याने उत्तर दिले.

जबरी चोरी आणि वाहन तोडफोडीच्या घटनेतील सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी सांगवी पोलिसांना चक्क वऱ्हाडी म्हणून त्याच्या नातेवाईकाच्या विवाह समारंभात सहभागी व्हावं लागलं. त्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेऊन विवाह समारंभातून आरोपीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. हा सर्व प्रकार चित्रपटाला साजेसा आहे. परंतु, तो प्रत्यक्षात घडला असून संबंधित आरोपीला भर लग्न मांडवातून पोलिसांनी अटक केली आहे.

ऋतिक उर्फ फिरंग्या श्रीधर सोळंकी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर वाहन तोडफोडीसह जबरी चोरीचा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात दाखल आहे, तर या अगोदर त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा देखील दाखल असल्याच पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

- Advertisement -

सविस्तर माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी जुन्या सांगवीत वाहनाची तोडफाड करण्यात आली होती. त्यातील आरोपी हा ऋतिक उर्फ फिरंग्या होता. तो पोलिसांना नेहमी चकवा देत फरार होत असे. सोमवारी आरोपी ऋतिक उर्फ फिरंग्या याच्या नातेवाईकाच्या मुलीची लग्न होते. त्याला तो येणार असल्याची गुप्त माहिती सांगवी पोलिसांना मिळाली होती. आरोपीच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाचे लग्न होते. त्यामुळे तो येणार असल्याची खात्री पोलिसांना होती. त्यानुसार साध्या गणवेशात पोलीस विवाहस्थळी वऱ्हाडी म्हणून दाखल झाले.

काही पोलीस मुख्य गेटवर थांबले होते. तर काही पोलीस कर्मचारी, अधिकारी आत आरोपी ऋतिक ला शोधत होते. फोटोवरून त्याची ओळख पटली. तेथील नातेवाईकांनी पोलिसांना हटकले तेव्हा, आम्ही मुलीकडील वऱ्हाडी असल्याचे अधिकाऱ्याने उत्तर दिले. पोलिसांनी जेवणावर ताव मारला आणि माणुसकी म्हणून विवाह होईपर्यंत आरोपीला अटक केली नाही. आरोपीला या बद्दल काहीच कल्पना नव्हती. अचानक पोलिसांनी त्याला घेराव घालत लग्नमांडवातून अटक केली. त्याने झटापट केली तेव्हा कर्मचाऱ्याने त्याच्या कानशिलात लगावली. या सर्व प्रकार पिंपरीचिंचवडमध्ये घडला आहे. याप्रकरणी दोन गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -