घरमहाराष्ट्रPrakash Ambedkar : अखेर ठरले, प्रकाश आंबेडकर अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार

Prakash Ambedkar : अखेर ठरले, प्रकाश आंबेडकर अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार

Subscribe

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बुधवारी 27 मार्चला अकोला लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत असलेली आपली युती संपुष्टात आल्याची घोषणा केली आहे. परंतु, दुसरीकडे मात्र त्यांनी काँग्रेसला 7 जागांवकर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. असे असतानाच आता आंबेडकरांकडन आणखी एका मोठी घोषणा करत मविआला धक्का दिला आहे. प्रकाश आंबेडकर हे बुधवारी 27 मार्चला अकोला लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, याबाबतची माहिती त्यांच्याकडूनच देण्यात आली आहे. आज (ता. 24 मार्च) मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. (Prakash Ambedkar will file his candidature from Akola Lok Sabha)

हेही वाचा… Sanjay Raut : प्रकाश आंबेडकरांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी, राऊतांची वंचितबाबत स्पष्ट भूमिका

- Advertisement -

उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत माहिती देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी 27 मार्चला अकोला लोकसभेतून उमेदवारी अर्ज भरणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने हा उमेदवार अर्ज भरण्यात येणार आहे. पण त्याआधी 26 मार्चला म्हणजेच बुधवारी पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात येईल. तर आम्ही मविआकडे केलेल्या आमच्या मागणीवर ठाम आहोत, पण मविआतील जागांचा तिढा सुटलेला नसल्याने त्यांच्या याद्या जाहीर होत नसल्याचे पाहायला मिळत आहेत, असे पुन्हा एकदा आंबेडकरांकडून सांगण्यात आले आहे.

तसेच, ज्या पद्धतीने फोडाफोडी आणि उमेदवारांची पळवापळवी सुरू आहे. त्याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की, 2014 सारखी आता सत्ताधाऱ्यांची ताकद राहिलेली नाही किंवा 2019 सारखाही यांचा प्रभाव राहिलेला नाही. ज्यामुळे भविष्यातील विचार करून समोरच्या पक्षाला कमकुवत करुन आपण जिंकू अशी स्थिती निर्माण करायची ही त्यांची स्ट्रॅटजी आहे, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

- Advertisement -

यावेळी त्यांनी मविआबाबत त्यांची नाराजीही उघडपणे बोलावून दाखवली आहे. आमच्या मागणीला फार काही प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला कुठेतरी सामावून घ्यायच म्हणून त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे अजून त्यांचाही निर्णय झालेला नाही आणि आमचाही निर्णय झालेला नाही. मविआमध्येच काही मतदार संघांबाबत मतभेद आहेत. काँग्रेसने उमेदवार यादी जाहीर केली. पण मतभेद असलेल्या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. काही मतदारसंघ सेनेने क्लेम केले आहेत, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांकडून देण्यात आली आहे. तर, त्यांचे ठरल्यावर ते आमच्या बरोबर बैठक करणार असतील, तर आम्ही सुद्धा तयार आहोत. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -