घरताज्या घडामोडीPraniti Shinde : इलेक्टोरल बॉण्डसह कोरोना लस...,प्रणिती शिंदेंनी सगळच काढलं; मोदी सरकारवर...

Praniti Shinde : इलेक्टोरल बॉण्डसह कोरोना लस…,प्रणिती शिंदेंनी सगळच काढलं; मोदी सरकारवर गंभीर आरोप

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून सात टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी पाच टप्प्यात मतदानप्रक्रीया पार पडणार आहे. त्यामुळ सर्वच पक्षश्रेष्टींनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी विविध गावांना भेटी दिल्या. शनिवारी आमदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना भेट दिली.

‘कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे ज्यांना दुखणं नव्हतं त्या व्यक्तींनाही हृदयविकाराचा त्रास सुरु झाला’, असा आरोप करत प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. शनिवारी आमदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना भेट दिली. त्यावेळी त्यांनी कोरोना लस आणि सध्या चर्चेत असलेल्या इलेक्टोरल बॉण्ड्सवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. (praniti shinde claims 100 crore paid to modi party that why vaccine contract to serum institute)

लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून सात टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी पाच टप्प्यात मतदानप्रक्रीया पार पडणार आहे. त्यामुळ सर्वच पक्षश्रेष्टींनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी विविध गावांना भेटी दिल्या. त्यावेळी उपस्थित गावकऱ्यांना संबोधिक करताना मोदी सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -

“आपल्याला ज्या सीरम कंपनीची कोरोना प्रतिबंधक लस जबरदस्तीने दिली. त्या कंपनीने देखील भाजपाला 100 कोटी रुपये दिले आहेत. आपल्याला कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास जबरदस्ती केली कारण सरकारने लस विकत घेतली होती. तसेच, तुमच्या आयुष्यावर पैसे कमवण्यासाठी सरकारने लस विकत घेतली आणि तुम्हाला त्या लसीसाठी जबरदस्ती केली”, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.

तसेच, “कोरोना प्रतिबंधक लसीसाठी जबरदस्ती केल्यामुळे आज काहींना अनेक त्रास सुरू झालेत. ज्या नागरिकांना काहीच नव्हतं, अशा नागरिकांना काही ना काही म्हणजे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे त्रास चालू झाले. मी तर लसच घेतली नाही. मोदींचे फोटो असताना मी लस कशासाठी घेऊ? आपला एकमेव देश आहे, जिथे लसीच्या सर्टिफीकेटवर मोदींचे फोटो होते”, असाही आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.

- Advertisement -

याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेवरती ताशेरे ओढले. इलेक्टोरल बॉण्डचा खुलासा करायला सांगितला. त्यामध्ये ज्या कंपन्यांना मोदींनी टेंडर दिले, त्या कंपन्यांनी मोदींना म्हणजे भाजपाला पैसे दिल्याचे समोर आले”, असाही गंभीर आरोप प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर केला.


हेही वाचा – INDIA : राहुल गांधींच्या शिवतीर्थावरील सभेवरुन बावनकळेंचा ठाकरेंना सवाल; संजय राऊतांनी असे दिले उत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -