घरमहाराष्ट्रनाशिकचक्क! जिल्हाधिकारी कार्यालयातच 'प्री-वेडिंग शूट'

चक्क! जिल्हाधिकारी कार्यालयातच ‘प्री-वेडिंग शूट’

Subscribe

नाशिक : खरं तर प्री-वेडिंग शूट हे सध्याचे वेड आहे, त्यामुळे ते करताना अनेक गमतीदार किस्से घडतात. शटिंगचे लोकेशन कुठले इथपासून ते त्यासाठी कपडे जमवणे, मेकअप, हेअर ड्रेसिंग ही आधीची तयारी. त्यानंतर त्यांच्याकडून पोजेस मिळवणे, चेहर्‍यावर त्यांना हव्या त्या गाण्यानुसार हावभाव मिळवणे यासाठी बराच तामझाम करावा लागतो. मात्र  एका नववविवाहीत जोडप्याने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतीतच ‘प्री वेडींग शूट’ करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र जिल्हाधिकार्‍यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले.

अलिकडच्या काळात प्री वेडींग शुटींग ही संकल्पना तरूणाईमध्ये चांगलीच रूजत चालली आहे. प्री-वेडिंग शूटसाठी आलेल्या जोडप्यांची मागणी अफाट असते. एक तर अशा शूटसाठी दिवसभरात सकाळ किंवा संध्याकाळ या दोनच वेळा चांगल्या असतात. मग दोन-तीन तास नुसते शुटिंग होते आणि असे पुन्हा त्यांच्या गरजांनुसार दोन ते तीन दिवस शूट चालते. नाशिकमध्ये एका नवविवाहीत जोडप्याने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच शुटींग करण्याचा निर्णय घेतला. सकाळी कार्यालयीन कामकाजाची वेळ असल्याने कार्यालयात रेलचेल होती. हे जोडपं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत फोटो शुटींग करत असतांना कर्मचार्‍यांच्या नजरेस पडले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच विवाह नोंदणी कार्यालय आहे.  नववविवाहीत जोडपे येथे विवाहाची नोंदणी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे चित्र तसे नित्याचेच परंतू या जोडप्याने अगदी कार्यालय परिसरात तासभर फोटो शुट करण्यास सुरूवात केल्याने कर्मचारी वर्गाचेही लक्ष वेधले गेले.

- Advertisement -

विशेष म्हणजे विनापरवानगी हा प्रकार घडत असतांना त्यांना कुणी हटकलेही नाही. याबाबत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना हा  प्रकार समजताच जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय पुन्हा असे प्रकार घडू नयेत याकरिता दुय्यम उपनिबंधकांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. कार्यालयाच्या आवारात वर्तन कसे हवे याचे मार्गदर्शन करणार्‍या सूचना विवाह नोंदणी कार्यालयात व बाहेर लावाव्यात असे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -