घरताज्या घडामोडीढगफुटीसदृश्य पावसाच्या बाधितांना तातडीने मदत द्या; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

ढगफुटीसदृश्य पावसाच्या बाधितांना तातडीने मदत द्या; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

Subscribe

पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. (Provide immediate relief to those affected by cloudburst like rain Instructions of CM eknath Shinde)

ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस

- Advertisement -

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

नुकसानीचे पंचनामे

- Advertisement -

ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा अनेक ठिकाणी हजेरी लावली. मुंबईसह उपनगरात काल सायंकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. नवी मुंबई, पनवेल, ठाणे परिसरात विजेच्या कडकडासह पाऊस पडला. अजूनही मुंबईसह उपनगरातील काही भागात पावसाची संततधार सुरुच आहे.

पुढील ३ दिवस यलो अलर्ट

मुंबईला ९ सप्टेंबरपासून पुढील ३ दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनंत चतुर्दशीपासून म्हणजेच ९ सप्टेंबरपासून ते ११ सप्टेंबरपर्यंत मुंबईत यलो अलर्ट असणार आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील शहर भागातील मलबार हिल, सीएसएमटी भागात १७ मिमी, पूर्व उपनगरातील मुंलुड येथे २८ मिमी, भांडुप – २७ मिमी, विक्रोळी -२६ मिमी, गवाणपाडा येथे २२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच, पश्चिम उपनगरातील अंधेरी (पूर्व) – ११ मिमी, मरोळ – ९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.


हेही वाचा – न्यायालयाच्या परवानगीनंतरच उद्धव ठाकरेंना संजय राऊतांची भेट घेता येणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -