घरमहाराष्ट्रPulwama Terror Attack : बुलडाण्याचे दोन सुपुत्र दहशतवादी हल्ल्यात शहीद

Pulwama Terror Attack : बुलडाण्याचे दोन सुपुत्र दहशतवादी हल्ल्यात शहीद

Subscribe

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात बुलडाण्याचे दोन सुपुत्र शदीद झाले आहेत. बुलडाण्याचे नितीन राठोड आणि संजय राजपूत या हल्ल्यात शहीद झाले आहेत.

गुरुवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरफीएफ) ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये बुलडाण्याचे दोन सुपुत्र शहीद झाले आहेत. या हल्ल्यामध्ये बुलडाण्याचे नितीन राठोड आणि संयज राजपूत शहीद झाले आहेत. संजय राजपूत आणि नितीन राठोड यांच्या शहीद होण्याच्या वृत्तामुळे संपूर्ण बुलडाणा जिल्यावर शोककळा पसरली आहे. संजय राजपूत यांचे कुटुंब बूलडाणाच्या मलकापूर येथील महाकाली नगर येथे वास्तव्यास आहे. त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुलं, दोन भाऊ, एक बहीण असं कुटुंब आहे. तर नितीन राठोड यांचे हे लोणार तालुक्यातील चोरपांगा गावातील रहिवाशी आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी वंदना नितीन राठोड, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, एक भाऊ आणि दोन बहीण असे कुटुंब आहे. शहीद जवान राठोड आणि राजपूत यांच्या वृत्तामुळे संपूर्ण जिल्ल्यामध्ये शोककळा पसरली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्त महाकाली नगर आणि चोरपांगा गावातील सर्व नागरीक संतप्त झाले आहेत. गावातील प्रत्येक नागरिकांनी या हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर द्यावी, अशी प्रतिक्रिया उमटवली आहे. ही जखम सहजासहजी भरुन काढता न येणारी आहे, अशी प्रतिक्रिया देशवासी देत आहेत.

पुलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ला

गुरुवारी काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा या भागात मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी साडे तीन किलोचे स्फोटके एका कारमध्ये टाकूण, ती कार सीआरपीएफ जवानांच्या बसला धडक दिली. या हल्ल्यात बसचा चक्का चूर झाला. यामध्ये ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. या हल्ल्यात उत्तर प्रदेशचे १२ जवान शहीद झाले आहेत. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सर्व जिल्ह्यातील जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत. महाराष्ट्रातील दोन जवान यात शहीद झाले आहेत. राजस्थानचे पाच जवान यामध्ये शहीद झाले आहेत. हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असून ज्या अतिरेत्याने या हल्ल्याचा कट घडवून आणला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत होत आहे. यामध्ये तो आपण जैश-ए-मोहम्मद संघटनेचे आहोत असे सांगत असून एक वर्षांपूर्वी आपण या संघटनेत सामील झालो होतो, असे सांगत आहे. हा व्हिडिओ जेव्हा प्रसारित होईल तेव्हा मी जन्नतमध्ये गेलेला असेल असं तो सांगत आहे. यावरुन तो स्फोटकांच्या गाडीमध्ये होता आणि त्याने हल्ल्यात स्वत:चे आत्मदहन केले अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारने प्रती ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -