घरमुंबईकल्याणमध्ये दहशतवाद्याला अटक? पण हे तर पोलिसांचे 'मॉक ड्रिल'

कल्याणमध्ये दहशतवाद्याला अटक? पण हे तर पोलिसांचे ‘मॉक ड्रिल’

Subscribe

कल्याणमध्ये दहशवाद्याला अटक करण्यात आल्याचा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र हा व्हिडिओ जुना असून सध्या कल्याणमध्ये पोलिसांनी 'मॉप ड्रिल' केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४१ जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असताना कल्याणमधील ‘डि-मार्ट’मध्ये बॉम्ब ठेवताना दहशतवाद्याला अटक केल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. मात्र नागरिकांनी व्हायरल झालेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन कलयाण पोलिसांनी केले आहे.

नेमके काय घडले?

कल्याण मधील बैल बाजार परिसरात असलेल्या डि मार्टमध्ये बॉम्ब असल्याचे मेसेज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरले. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अनेक नागरिकांनी दहशदवादी सापडल्याच्या भीतीने कल्याणमध्ये जाणे टाळले आहे. मात्र नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आनृहे. तसेच कल्यामधील डि मार्टमध्ये कोणताही दहशदवादी नसून पोलिसांनी ‘मॉप ड्रिल’ केल्याचे समोर आले आहे. एखाद्यावेळेस दहशतवादी घुसल्यास काय करावे याचे ‘मॉप ड्रिल’ नागरिकांना दाखवण्यात आले. तसेच यावेळी आपत्कालीन काळात करण्यात येत असलेल्या ऑपरेशनची माहिती देखील नागरिकांना देण्यात आली. त्यामुळे व्हायरल झालेला व्हिडिओ हा जुना असून त्यावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Pulwama Attack : अवघ्या २२ व्यावर्षी मानवी बाँब बनण्याचं धाडस आलं कुठून?

हेही वाचा – ‘विसरणार नाही, माफही करणार नाही’; सीआरपीएफचं ट्विट

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -