घरमहाराष्ट्रपुण्यात घटस्फोटाच्या वादातून शिक्षिकेला जाळण्याचा प्रयत्न

पुण्यात घटस्फोटाच्या वादातून शिक्षिकेला जाळण्याचा प्रयत्न

Subscribe

पुण्यात एका शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसमोरच आपल्या पत्नी जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पुण्यातील नऱ्हे आंबेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घटस्फोटाच्या वादातून प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेला वर्गाच्या बाहेर काढत जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. संतोष चव्हाण असे या नराधम पतीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघा नवरा बायकोमध्ये घटस्फोटावरुन वाद सुरू होता.

विद्यार्थी, शिक्षकांसमोर जाळण्याचा प्रयत्न केला 

दरम्यान, कोर्टात घटस्फोटावर सुनावणीच्या वेळी का आली नाहीस, असे विचारत या नराधम पतीने आपल्या पत्नीला वर्गाच्या बाहेर फरफटत आणत शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि तिला जाळण्याचा प्रयत्न केला. हा सगळा धक्कादायक प्रकार शाळेतील विद्यार्थ्यांसमोर आणि शिक्कांसमोर घडल्याने शाळेत भीतीचे वातावरण होते.

- Advertisement -

आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल 

आरोपी पती संतोष चव्हाण याच्यावर पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सिंहगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन कारवाई करत आरोपीला अटक केली केली. तसेच या प्रकरणी पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -