घरमहाराष्ट्रपुणेधनुष्यबाण आपल्याकडे कसा आणायचा त्यासाठी आम्ही प्लॅन करू- नाना पटोले

धनुष्यबाण आपल्याकडे कसा आणायचा त्यासाठी आम्ही प्लॅन करू- नाना पटोले

Subscribe

यावेळी नाना पटोले म्हणाले की, "धनुष्यबाण आपल्याला परत आणायचाय. तो कसा आणायचा तो प्लॅन...."

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवडचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात झालीय. चिंचवडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी आता अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले मैदानात उतरले आहेत. या प्रचारसभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धनुष्यबाण परत आणण्याचा निर्धार केलाय. यासाठी त्यांच्याकडे प्लॅनही असल्याचं ते म्हणाले.

भाजप नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर होत असलेल्या या चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नेते नाना काटे हे उमेदवार आहेत. नाना काटे यांच्या प्रचारासाठी आज सभा होतेय. यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित आहेत. अजित पवार, नाना पटोले आणि आदित्य ठाकरे आज या प्रचारसभेला संबोधित करत आहेत. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

- Advertisement -

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “चिंचवड मतदारसंघात सर्व्हे केला असून यात नाना काटे हे विजयी होत आहेत. पण नाना काटे हे कमी मताने नव्हे तर बहुमताने निवडून आलेलं मला पहाचंय.” नाना काटे आणि रविंद्र धंगेकर यांच्या विजयासाठी नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना मूठ बांधण्याचं आवाहन केलंय. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मुठ बांधली की त्याला धनुष्यबाण येतो, घडीही येते आणि पंजाही येतो. हे तीनही येतात. आपला धनुष्यबाण आपल्याला परत आणायचाय. तो कसा आणायचा तो प्लॅन आम्ही करू” असं आश्वासन नाना पटोले यांनी आदित्य ठाकरेंना दिलाय.

यावेळी बोलताना नाना पटोले शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढायला विसरले नाहीत. “सत्तेची गर्मी ज्या लोकांना आली आहे त्यांना महाविकास आघाडीची शक्ती दाखवण्याची वेळ आलीय. महाविकास आघाडी सरकारला ज्या पद्धतीने बेईमानीने पाडलं, धोक्यानं पाडलं, खोक्यानं पाडलं, त्या महाशक्तीच्या जोरावर ते जोर दाखवता आहेत, त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलीय.” असं देखील नाना पटोले म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -