घरमहाराष्ट्रपुणे'अकासा एअर'च्या विमानातील ऑफ-ड्युटी पायलटकडून तरुणीचा छळ

‘अकासा एअर’च्या विमानातील ऑफ-ड्युटी पायलटकडून तरुणीचा छळ

Subscribe

अकासा एअरलाइन्समधून प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अकासा एअरलाइन्समधून प्रवास करणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीने तिच्यासोबत अकासा एअरलाइन्समधील ऑफ-ड्युटी असलेल्या पायलटकडूनच छळ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

पुणे : अकासा एअरलाइन्समधून प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अकासा एअरलाइन्समधून प्रवास करणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीने तिच्यासोबत अकासा एअरलाइन्समधील ऑफ-ड्युटी असलेल्या पायलटकडूनच छळ झाल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेची तक्रार सदर मुलीने विमानातील कर्मचाऱ्यांकडे आणि एअरलाइन्सकडे देखील केली. मात्र त्यांच्याकडून त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही किंवा त्यांनी त्या पायलटवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप मुलीकडून करण्यात आला आहे. (Girl molested by off-duty pilot of ‘Akasa Air’ plane)

हेही वाचा – मोठी बातमी: ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अखेर अटक

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आपली तीन महिन्यांची इंटर्नशीप संपवून 20 वर्षीय तरुणी बंगळुरूहून पुण्याला जाण्यासाठी निघाली होती. यावेळी ती अकासा एअरच्या बंगळुरू-पुणे या विमानातून प्रवास करत असताना ऑफ-ड्युटी असलेल्या पायलटने सुरुवातीला सामान ठेवण्याच्या निमित्ताने मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो त्याच एअरलाइन्सचा पायलट असल्याचे सांगितले. यानंतर त्याने थोड्यावेळाने एका फ्लाइट अटेडंटद्वारे तिला मागील बाजूस जिथे कर्मचारी होते तिथे येण्याची विनंती केली. सामानाबद्दल समस्या असावी असे वाटल्यामुळे ती तरुणी तिथे गेली.

यानंतर तरुणीने पायलटला विचारणा केली असता त्याने तिला मद्य देऊ केले, ज्याला त्या तरुणीने नकार दिला. तो सतत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, तिला त्याच्या वागणुकीमुळे अत्यंत अस्वस्थ जाणवत होते. यानंतर पुण्यात उतरल्यावरही त्याचे बेशिस्त वर्तन सुरूच होते, अशी माहिती 20 वर्षीय तरुणीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची अकासा एअरने सखोल चौकशीचे आणि सोशल मीडिया टीमकडून तरुणीशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा केला आहे. या घटनेच्या 15 दिवसांनी, म्हणजेच सोमवारी (ता. 16 ऑक्टोबर) ‘अकासा’ने पोस्टला प्रतिसाद दिला असला तरी अद्याप संपर्क साधला नसल्याचे तरुणीने म्हटले आहे. ही घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडकीस आल्यानंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर अद्यापही ऑफ-ड्युटी असलेल्या पायलटवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचेच सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -