घरमहाराष्ट्रपुणेपुण्यातील कुरकुंभ येथील रासायनिक कंपनीत भीषण स्फोट; सुदैवाने जीवितहानी नाही

पुण्यातील कुरकुंभ येथील रासायनिक कंपनीत भीषण स्फोट; सुदैवाने जीवितहानी नाही

Subscribe

या स्फोटावेळी सुदैवाने त्या ठिकाणी अधिक कामगार उपस्थित नव्हते.

पुणे (pune) येथील कुरकुंभ (kurkummbh) औद्योगिक क्षेत्रात असलेल्या प्लॉट क्रमांक डी- 18 शोगन ऑरगॅनिक्स लिमिटेड या केमिकल कंपनीमध्ये रिअक्टरमध्ये निर्माण झालेल्या दाबामुळे स्फोट झाला आहे. ही घटना घडल्याने एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली. या स्फोटात कंपनीला लावण्यात आलेल्या पत्र्याचेसुद्धा तुकडे झाले आणि पुणे – सोलापूर महामार्गावर उडाले. हा स्फोट खूपच भीषण होता. यामध्ये तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

या स्फोटात जखमी झालेल्या कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शोगन ऑरगॅनिक्स लिमिटेड या प्रोप्राजेल क्लोराईडच्या रासायनीक प्रकिया करण्याचे काम केले जाते. पण ही प्रक्रिया सुरु असताना रिअक्टरमध्ये निर्माण झालेल्या दाबामुळे हा मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटावेळी सुदैवाने त्या ठिकाणी अधिक कामगार उपस्थित नव्हते आणि यामध्ये जीवितहानी सुद्धा झाली नाही अशी माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

या स्फोटात प्रत्यक्षदर्शी असलेल्या उपेंद्र सिसोदिया, हरिकिशन असून तिसऱ्या कामगाराचे नाव समजू शकले नाही अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. रिअक्टरमध्ये नेमका दबाव निर्माण होण्याचे कारण काय असेल हे मात्र अजून समोर आलेले नाही. कुरकुंभ औद्योगिक वसाहत भागात केमिकल कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत.

त्यामुळे त्या भागात अशा घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तर काही व्यक्तींना कायमचे अपंगत्वसुद्धा आले आहे. त्यामुळेच अशा घटनांनी अजून किती जीव जाणार आहेत? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अशा घटनांमुळे आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबातत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प वाचवण्यासाठी फडणवीस रेल्वेमंत्र्यांना भेटणार

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -