घरमहाराष्ट्रशिवसेनेच्या या चार खासदारांना भाजपने मुद्दामून पाडलं - राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

शिवसेनेच्या या चार खासदारांना भाजपने मुद्दामून पाडलं – राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

Subscribe

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करत असताना भाजपवर खळबळजनक आरोप केला. ईव्हीएमच्या घोळाबाबत बोलत असताना राज ठाकरे म्हणाले की, “शिवसेनेच्या चार ज्येष्ठ खासदारांना मंत्रीपद द्यायचे नव्हते, म्हणून त्यांना ईव्हीएमचा घोळ करून पाडण्यात आलं.” हा आरोप करत असताना राज ठाकरे यांनी त्याच खासदारांची यादीच सभेत वाचून दाखवली.

शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार आनंदराव अडसूळ हे अमरावतीमधून पराभूत झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नवनीत कौर राणा यांनी त्यांचा पराभव केला.

- Advertisement -

शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवेसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.

औरंगाबाद मतदारसंघात शिवेसेनेचे ज्येष्ठ खासदार चंद्रकांत खैरे यांचाही पराभव करण्यात आला होता. हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करण्यासाठी एक माणूस या लोकांना हवाच होता. त्यामुळे याठिकाणी एमआयएमचा खासदार निवडून आणण्यात आला. ज्यामुळे एमआयएमकडे सातत्याने बोट दाखवून धार्मिक तणाव वाढवता येईल.

- Advertisement -

रायगड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हे सोळाव्या लोकसभेत मंत्री होते. त्यांचाही यावेळी पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी त्यांचा पराभव केला.

काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला, त्याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या एक आठवड्यापूर्वी एक माणूस शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आला. जो काँग्रेसलाच नको होता. तोच निवडून आला आणि बाकी सगळे काँग्रेसवाले पडले, हे कसं काय झालं? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -