घरमहाराष्ट्रBabasaheb Purandare : महाराजांचा सेवक साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला; पुरंदरेंच्या निधनाने...

Babasaheb Purandare : महाराजांचा सेवक साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला; पुरंदरेंच्या निधनाने राज ठाकरे भावूक

Subscribe

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात निधन झालं. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना विविध क्षेत्रातल्या लोकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. राज ठाकरे यांनी एक पोस्ट लिहित पुरंदरे यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक आज साक्षात त्यांची सेवा करण्यासाठी निघाला, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्टर शेअर केलं. ज्यात त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातील आव्हानं ह्याबाबत त्यांच्याकडून कायम मार्गदर्शन होत आलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, परंतु मला पितृतुल्यही होते,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

“बाबासाहेब मला नेहमी सांगत, महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला, तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे, महाराज जिथे गेलेत तिथे जायची! शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला…,” असं राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात निधन झालं. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर पुण्यातील शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबासाहेब पुरंदरे यांना न्युमोनिया झाला असून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अतिदक्षता विभागात त्यांना ठेवण्यात आलं असून प्रकृती अतिशय खालावली आहे, अशी माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी रविवारी संध्याकाळई दिली होती. दरम्यान, सोमवारी सकाळी ५.०७ वाजता बाबासाहेब पुरंदरे यांनी अखेरचा श्वास घेतला.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -