अरे पण तू कोण आहे? वल्लभ भाई पटेल की महात्मा गांधी, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फटकारलं

Raj Thackeray slams Uddhav Thackeray Oh who are you Vallabhbhai Patel's Mahatma Gandhi
अरे पण तू कोण आहे? वल्लभ भाई पटेल की महात्मा गांधी, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फटकारलं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच्या नामांतरवरुन केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. संभाजी नगरचे नामांतर झाले मी बोलतोय ना असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभेदरम्यान म्हणाले होते. याचा राज ठाकरेंनी तु कोण आहे? असे बोलून समाचार घेतला आहे. तसेच औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु झालेल्या राजकारणावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे.

राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.. संभाजीनगरचं नामांतर झालं काय आणि नाही झालं काय? मी बोलतोय ना.. आरे पण तू कोण आहे? तु कोण सरदार पटेल की महात्मा गांधी आहे. मी बोलतोय ला काय लॉजिक आहे. केंद्रात सत्ता होती नामांतराचा प्रश्न मिटवला का, कारण तो प्रश्न सतत जिवंत ठेवून त्यावरुन मत मिळवायची आहेत. याच गोष्टी फक्त करायच्या आहेत. संभाजीनगरचे नाव झाले तर प्रश्न मिटेल बोलायचे कसं? दहा दहा दिवस पाणी येत नाही. संभाजीनगर जालना अनेक विभागात पाणी नाही. ते विषय नाही. मी मागच्या ठाण्याच्या सभेत म्हणालो होतो या देशात मोदींनी लवकर समान नागरिक कायदा आणावा, लोकसंख्या नियंत्रणासाठी नवीन कायदा आणावा, तसेच मोदींना विनंती आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करुन यांचे राजकारण मोडीत काढा असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, यांच्या राजकारणासाठी म्हणून एमयएमला मोठा केला. ते सतत बोलत राहिली पाहिजे ज्याच्यातून यांची रोजीरोटी सुरु राहील. यांच्या लक्षात नाही आले आपण एक राक्षस वाढवत आहे. म्हणता म्हणता एमआयएमचा खासदार झाला. या सगळ्या निजामाच्या औलादी महाराष्ट्रात यांना जमीन दिली कोणी यांनीच करुन दिली आहे. शिवसेनेचा तिकडचा खासदार पडला आणि एमआयएमचा निवडून आला. आमच्याच देशात महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि जो शिवछत्रपतींना मारण्यासाठी आला त्याच्यात कबरीवर डोकं टेकतात. आम्हाला लाज नाही कारण सत्तेसाठी बसले आहेत अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.

शरद पवारांना औरंगजेब सूफी संत वाटतो

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावरसुद्धा निशाणा साधला आहे. शरद पवरांना सुफी संत वाटत असेल तर काय बोलणार, तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलत आहात. यांचे हे जे सगळ राजकारण तुम्ही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी हे राजकारण करणार, कोणी कोणाला भेटतय काय चाललंय असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगावं एकतरी केस त्यांच्या अंगावर आहे का?, राज ठाकरेंचा थेट सवाल