घरताज्या घडामोडीमाझ्यावर ED, IT ची धाड न पडल्याने आमदारांच्या यादीतून नाव वगळले असावे...

माझ्यावर ED, IT ची धाड न पडल्याने आमदारांच्या यादीतून नाव वगळले असावे – राजू शेट्टी

Subscribe

राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या नेमणुकीबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बुधवारी भेट घेतली. पण या भेटीनंतर राज्यपालांच्या निर्णय प्रक्रियेच्या निमित्ताने प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही या संपुर्ण नेमणुकांच्या बाबतीत प्रतिक्रिया दिली आहे. मला यात फारसा रस राहिलेला नाही, तसेच मी याबाबतचा पाठपुरावाही केला नाही. त्यामुळे राज्यपालांनी जो निर्णय घ्यायचा तो घ्यावा, मला फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कदाचित ईडी आणि इनकम टॅक्सची धाड न पडल्यानेच मला संधी दिली नसावी असे राजू शेट्टी म्हणाले. महाविकास आघाडीने कॅबिनेट निर्णयाद्वारे पाठवलेल्या यादीतून राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा पत्ता कट होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यानंतरच माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (Raju Shetti reacted on dropping name from governor appointed mlc list )

मी कोणताही दरोडा घातलेला नाही. माझ्यावर ईडीची कारवाई होत नाही. इतर कोणतीही कारवाई त्यांना करता येत नाही. जनतेच्या प्रश्नावर माझ्यावर गुन्हे दाखल झाल्याचा मला अभिमान आहे. जनतेच्या प्रश्नासाठी असलेल्या गुन्ह्याची मला लाज वाटत नाही. त्यामुळे राज्यपालांनी काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, मला फरक पडत नाही, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी या संपुर्ण नेमणुकीच्या प्रक्रियेवर प्रतिक्रिया दिली आहे. मी या आमदारकीच्या नेमणुकीबाबत कधीच पाठपुरावा केला नाही. आपल्याला यात फारसा रस राहिलेला नाही. त्यामुळे आमदारकीच्या मुद्द्यावर राज्यपालांच्या निर्णयाने काहीही फरक पडत नाही, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी संपुर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

१२ आमदारांच्या यादीत कोणाचा समावेश ?

राज्यपाल नामनिर्देषित १२ आमदारांच्या यादीचा प्रस्ताव हा महाविकास आघाडी सरकारने कॅबिनेट निर्णय घेऊन राज्यपालांकडे पाठवला होता. राज्यपालांच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव गेल्या ९ महिन्यांपासून प्रतिक्षेत आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षातील आमदारांचा समावेश या १२ जणांच्या यादीत आहे. कॉंग्रेसकडून सचिन सावंत, रजनी पाटी, मुजफ्फर हुसैन, अनिरूद्ध वणगे यांचा समावेश १२ जणांच्या यादीत आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. शिवसेनेने उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी ही नावे राज्यपाल नामनिर्देशित यादीसाठी पाठवली आहेत.


हे ही वाचा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट, १२ आमदार नियुक्तीबाबत तोडगा निघण्याची शक्यता

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -