घरमहाराष्ट्रAnil Deshmukh Case: CBI ने आपल्याच अधिकाऱ्याला केली अटक, रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याचा...

Anil Deshmukh Case: CBI ने आपल्याच अधिकाऱ्याला केली अटक, रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याचा आरोप

Subscribe

सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात चौकशी करत असलेल्या आपल्याच अधिकाऱ्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अभिषेक तिवारी असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. अनिल देशमुख प्रकरणाच्या चौकशी अहवालात छेडछाड केल्याचा आरोप सीबीआयने त्यांच्यावर ठेवला आहे.

अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिल्याचा अहवाल २९ ऑगस्टला समोर आला होता. या अहवालात अनिल देशमुख यांनी कुठलाही दखलपात्र गुन्हा केलेला नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर सीबीआयने हा दावा फेटाळत या प्रकरणाची चौकशी सुरु केली. १०० कोटी वसुली प्रकरणातील अनिल देशमुखांच्या प्राथमिक चौकशीचा रिपोर्ट मॅनेज करण्यासाठी लाच देण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला होता. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याला लाच देण्यात आली होती त्याअनुषंगाने चौकशी सुरू होती. १५ दिवसांच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल बनवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या टीममधील एका अधिकाऱ्याला लाच देण्यात आली होती, असा संशय सीबीआयला होता. दरम्यान, ज्या अधिकाऱ्याने लाच घेतली त्या अभिषेक तिवारी या अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे.

- Advertisement -

अनिल देशमुख यांच्या वकिलाला अटक

अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने मुंबईत अटक केली आहे. सीबीआयमधील अधिकारी अभिषेक तिवारी यांच्यामार्फत अहवालात छेडछाड केल्याच्या आरोपाखाली डागा यांना अटक करण्यात आली आहे.

देशमुख यांच्या जावयाला सीबीआयनं सोडलं

अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांनाही काल रात्री सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. वरळी इथल्या सुखदा इमारतीमध्ये गौरव चतुर्वेदी आले होते. त्याचवेळी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतलं. मात्र, देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी यांची भूमिका स्पष्ट झाली नाही म्हणून त्यांना सोडून देण्यात आलं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -