मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट, १२ आमदार नियुक्तीबाबत तोडगा निघण्याची शक्यता

राज्यपाल नियुक्ती १२ आमदारांबाबात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

cm uddhav thackeray today meets governor bhagat singh koshyari over appointment of 12 mla
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट, १२ आमदार नियुक्तीबाबत तोडगा निघण्याची शक्यता

विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७.३० वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात देखील आहेत. त्यामुळे आता राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत तोडगा निघणार का नाही? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

मागील नऊ महिन्यांहून अधिक काळापासून १२ राज्यपाल नियुक्त आमदारांचा पेच प्रलंबित असून नोव्हेंबर २०२० रोजी राज्यमंत्रीमंडळाकडून १२ आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवण्यात आली होती. मात्र अजूनही त्यावर काही तोडगा निघाला नाही आहे. यादरम्यान राज्यपाल नियुक्ती १२ आमदारांबाबात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच यावरून राज्यातील विविध भागात १२ सदस्य नियुक्त प्रलंबित राहिल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सर्व स्तरावरून टीका केली. मात्र आज थोड्याच वेळात मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेतली आणि यावर निर्णय आज घेतला जाईल अशी आशा आहे.

याबाबत हायकोर्ट काय म्हणाले होते? 

राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असल्यामुळे न्यायालय राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही. यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे. मात्र, मंत्रिमंडळाने दिलेला प्रस्ताव राज्यपाल अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेऊ शकत नाहीत. राज्यपालांनी १२ आमदारांचा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव फेटाळावा अथवा तो संमत करावा, असेही हायकोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यपाल काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

या यादीत कोणाच्या नावाची केली होती शिफारस?

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे. काँग्रेसचे रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध वनकर. तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन पाटील यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.