घरताज्या घडामोडीराऊतांमुळेच शिवसेनेचे वाटोळं, राऊतांनी माझ्यासमोर निवडणूक लढवावी; खा. गोडसेंचा पलटवार

राऊतांमुळेच शिवसेनेचे वाटोळं, राऊतांनी माझ्यासमोर निवडणूक लढवावी; खा. गोडसेंचा पलटवार

Subscribe

नाशिक : नाशिक दौर्‍यावर आलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर तोशेरे ओढले. गोडसे हा चेहरा होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केल्यानंतर या प्रश्नाला गोडसे यांनी सडेतोड उत्तर दिले असून चेहरा महत्वाचा नसतो, तर काम महत्वाचे असते. या माणसामुळे संपूर्ण शिवसेनेचे वाटोळे झाले असून काँग्रेस राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपविण्याचे सुरु असल्याचा खळबळजनक आरोप गोडसे यांनी केला आहे. शिवाय संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन निवडणूक लढवून दाखवावी असे ओपन चॅलेंजच गोडसे यांनी राऊत यांना दिले आहे.

संजय राऊत हे दोन दिवसांपासून नाशिक दौर्‍यावर आले असता पत्रकार परिषदेत शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले खासदार हेमंत गोडसे यांचा समाचार घेतला. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी स्वतःची कबर खोदली असून आता त्यांनी निवडणुकीत निवडून येऊन दाखवावे असे थेट चॅलेंज दिले. यानंतर आज खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्या प्रश्नाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन निवडणूक लढवून दाखवावी, हिम्मत असेल तर माझ्या समोर येऊन निवडणूक लढा’ असे चॅलेंजचं एकप्रकारे गोडसे यांनी संजय राऊत यांना दिले आहे. त्यामुळे या राजकीय वादाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

राउत यांच्या कार्यशैलीवर तोशेरे ओढतांना गोडसे म्हणाले की, शिवसेना हाच चेहरा, गोडसे चेहरा आहे का? तर चेहरा नाही तर काम महत्वाचे असते. राऊत यांनी नाशिककरांच्या समस्या जाणून घेतल्या का? शेतकर्‍यांना बांधावर जाऊन भेटले का? शहरातील उद्योजकांची बैठक घेतली का? कधी उद्योजक आणि शेतकर्‍यांची बैठक घेतली का? या माणसामुळे संपूर्ण शिवसेनेचे वाटोळे झाले असून काँग्रेस राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपविण्याचे सुरु आहे. एकट्या माणसामुळे शिवसेनेची विल्हेवाट लागली. उद्धव, आदित्य ठाकरे यांचा विश्वासघात करण्याचे काम राऊत करत असून त्यांच्या चेहर्‍यामुळे राजकारणाची प्रतिमा मलिन होत आहे, अशी खरामरीत टीका हेमंत गोडसे यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -