घरताज्या घडामोडीदेशभरातील 340 महिला अग्निवीरांचा पुढच्या वर्षी होणार नौदलात समावेश

देशभरातील 340 महिला अग्निवीरांचा पुढच्या वर्षी होणार नौदलात समावेश

Subscribe

नौदलात अग्निवीरांची पहिली टीम तयार करण्यात येत आहे. 10 लाख 82 हजार उमेदवारांनी यासाठी देशभरातून अर्ज केले होते. त्यातील सुमारे 3474 अग्निवीर नौदलात सहभागी झाले आहेत. या 3474 अग्निवीरांपैकी सुमारे 340 महिला नौदलात सहभागी होणार आहेत.

नौदलात अग्निवीरांची पहिली टीम तयार करण्यात येत आहे. 10 लाख 82 हजार उमेदवारांनी यासाठी देशभरातून अर्ज केले होते. त्यातील सुमारे 3474 अग्निवीर नौदलात सहभागी झाले आहेत. या 3474 अग्निवीरांपैकी सुमारे 340 महिला नौदलात सहभागी होणार आहेत. या 340 महिला नौदलाच्या सर्व शाखांमध्ये काम करणार आहेत. याबाबत भारतीय नौदलाचे पश्चिम कमांडचे व्हाइस अडमिरल अजेंद्र बहादुर सिंह यांनी माहिती दिली. (from agniveer 340 women will join the navy)

या 340 महिला अग्निवीरांचा पुढच्या वर्षी नौदलात समावेश होणार आहे. या महिला अधिकाऱ्यांना सर्व शाखांमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यानुसार, नौदलाच्या सर्व 29 शाखांमध्ये या महिला काम करणार आहेत. मात्र, या महिलांच्या सहभागापूर्वी त्यांची मेडिकल चाचणी केली जाणार आहे. तसेच, इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही तुकडी तैनात करण्यात येणार आहे. त्यानंतर एकूण किती जण यामध्ये सहभागी होणार याबाबत माहिती समोर येणार असल्याचे अजेंद्र बहादुर सिंह यांनी सांगितले.

- Advertisement -

“कोस्टल सेक्युरिटीच्या दृष्टिकोनातून अनेक मुद्यांवर चर्चा सुरू असून यामध्ये अनेक एजन्सी आहेत. चीफ सिक्रेटरींसोबत एक बैठक झाली. या बैठकीनुसार सहकार्याची गरज असून त्यासाठी सहकार्य करत आहे. राज्य आणि आमची दोघांची जबाबदारी आहे. काही नव्या गाईडलाइन्स बनविल्या गेल्या असून कोस्टल सेक्युरिटीवर काम सुरू आहे. त्याशिवाय, नार्कोटिक्स ऑपरेशनसाठी सर्व एजन्सी एकत्रितरित्या काम करत आहेत. ड्रग पकडण्यात यश मिळत आहे. अलीकडच्या काळात ड्रग्स तस्करीविरोधात अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत”, अशी माहितीही यावेळी अजेंद्र बहादुर सिंह यांनी दिली.

दरम्यान, “भारताची 45 जहाजे शिपयार्डमध्ये तयार होत आहेत. यामध्ये खासगी आणि पब्लिक सेक्टर शिपयार्ड आहेत. मार्मा गोवा युद्धनौका 18 डिसेंबरला कमिशनिंग होणार आहे. प्रोजेक्ट 17 अल्फा 6 जहाज यामध्ये आहेत. हे जहाज माजगाव आणि कोलकत्तामध्ये बनत आहेत. शिवाय गोव्यात तलवार क्लासचे दोन जहाज तयार होत आहेत. तर दोन जहाजे देशाबाहेर बनत आहेत. तर उर्वरित 43 जहाजांचे बांधकाम भारतात बनत आहेत. तर दोन जहाजांचे काम रशियामध्ये सुरू आहे”, अशीही माहिती यावेळी अजेंद्र बहादुर सिंह यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – औरंगाबाद जीएसटी विभागाच्या कारवाईत कोट्यवधींच्या बनावट बिलांचा घोटाळा उघड

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -