घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने रोहित पवारांनी साधला शिंदे गटातील आमदारांवर निशाणा

मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने रोहित पवारांनी साधला शिंदे गटातील आमदारांवर निशाणा

Subscribe

शिंदेंच्या गटातून मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची विरोधक खिल्ली उडवताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीतील शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी देखील मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटातील आमदारांवर बोचरी टीका केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळावी, यासाठी सर्वाधिक उत्सुक आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार. परंतु अद्यापही या मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः महाडचे आमदार भरतशेठ गोगावले हे सर्वाधिक नाराज असून ते वारंवार आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहेत. तर दुसरीकडे संजय शिरसाठ हे देखील मंत्रिमंडळात स्थान मिळत नसल्याने अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळत आहेत. परंतु शिंदेंच्या गटातून मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची विरोधक खिल्ली उडवताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीतील शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी देखील मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटातील आमदारांवर बोचरी टीका केली आहे. (Rohit Pawar targeted MLAs from the Shinde faction as the cabinet expansion stalled)

हेही वाचा – ‘फेसबुकवर नाही तर हे फेस टू फेस बोलणार सरकार’; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयाला रोहित पवार यांनी भेट दिली. त्यावेळी, माध्यम प्रतिनीधींच्या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि शिंदे गटातील आमदारांवर भाष्य केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ज्या जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये आपण बसलोय तिथेही एकजण इच्छुक आहेच ना. अनेक आमदारांनी कपडे शिवले होते, कोणाचे वजन वाढले म्हणून ते बसेनात. तर, काहींना जाळूनही टाकले असे आम्हाला समजले. कारण, गेल्या महिन्याच्या 2 तारखेनंतर सगळ्यांना कळले आहे की, आता नवीन मंत्रीपदं मिळणार नाहीत, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला. तर यावेळी त्यांनी केलेल्या टीकेमध्ये संजय शिरसाट यांचे नाव घेतले नाही.

काल (ता. 16 ऑगस्ट) रायगडमधील एका कार्यक्रमात आमदार भरत गोगावले यांनी आपली नाराजी पुन्हा एकदा व्यक्त केली. सरळपणे मी नाराज असल्याचे गोगावले यांनी सांगितले नसले तरी एक मंत्रिमंडळ विस्तारावेळी घडलेला एक किस्सा सांगत आपली नाराजी व्यक्त केली. पहिल्या 18 जणांच्या यादीत माझे नाव होते. पण मुख्यमंत्री शिंदे अडचणीत सापडले होते. कारण एका आमदाराने सांगितले की, मला मंत्रीपद दिले नाही तर, माझी बायको आत्महत्या करेल. दुसऱ्याने, नारायण राणे मला संपवतील, असे सांगितले. तर तिसऱ्याने थेट राजीनाम्याची धमकी दिली होती. यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर पेच निर्माण झाला होता. तुम्हा पाचपैकी दोघांना मंत्रीपद दिली असल्याचे सांगत संभाजीनगरमधील आमदाराला समजावले, असे गोगावले म्हणाले.

- Advertisement -

आता बायकोचे कारण देणाऱ्याचे काय करायचे? त्याच्या बायकोला जगवायला पाहिजे, म्हणून त्याला मंत्रीपद देऊन टाका, असे सांगितले. तिसऱ्याला नारायण राणेंनी यांनी संपवायला नको, यामुळे आपली एक सीट कमी होईल. त्यामुळे त्यालाही द्या. मी थांबतो तुमच्यासाठी… आणि मी जो थांबलो तो आजपर्यंत थांबलो, अशी व्यथा त्यांनी मांडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -