घरमहाराष्ट्र'सरकारच्या कार्यकाळातच राममंदिर निर्मितीचे आश्वासन पूर्ण करावे'

‘सरकारच्या कार्यकाळातच राममंदिर निर्मितीचे आश्वासन पूर्ण करावे’

Subscribe

नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिलेल्या मुलाखतीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या कार्यकाळातच राममंदिर निर्मितीचे आश्वासन पूर्ण करावे, असे दत्तात्रेय होसबले म्हणाले आहेत.

केंद्रातील विद्यमान भाजप सरकारने आपल्या कार्यकाळात राममंदिर निर्मितीचे आश्वासन पूर्ण करावे, अशी देशवासियांची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबले यांनी दिली आहे. बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यांना दिलेल्या दिलेल्या मुलाखतींवर प्रतिक्रिया देताना होसबले यांनी असे मत व्यक्त केले आहे. नववर्षानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यांच्या निवडणुका, सर्जिकल स्ट्राईक यांसह विविध मुद्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले होसबले?

याविषयी बोलताना दत्तात्रेय होसबले म्हणाले की, आम्हाला पंतप्रधानांनी आज राम मंदिरासंदर्भात केलेले विधान सकारात्मक पाऊल वाटते. मोदी यांच्या नेतृत्वात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या जाहिरनाम्यात अयोध्येत राममंदिर निर्मितीसाठी संविधानाच्या कक्षेत राहून सर्व संभाव्य प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर भारतीय जनतेने विश्वास ठेऊन भाजपला बहुमत दिले आहे, असेही होसबले म्हणाले. पंतप्रधानांनी अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर निर्मितीच्या संकल्पाचा मुलाखतीत पुनरुच्चार करणे हे भाजपच्या पालमपूर अधिवेशनात (१९८९) पारित केलेल्या प्रस्तावानुरूपच आहे, असेही होसबले म्हणाले.

- Advertisement -

विश्व हिंदू परिषदही आक्रमक

दरम्यान, राम मंदिराच्या मुद्यावर विश्व हिंदू परिषद देखील आक्रमक झाली आहे. आज विश्व हिंदू परिषदेने दिल्ली येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेने सरकारला याच अधिवेशनात राम मंदिराच्या प्रश्नावर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. यासाठी ३१ जानेवारीला विश्व हिंदू परिषदेने महासभेचे आयोजन केले असल्याचे सांगितले आहे.


हेही वाचा – ‘राम मंदिरासाठी हिंदू समाज आणखी प्रतिक्षा करु शकत नाही’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -