घरमहाराष्ट्रपरिवहन भ्रष्टाचार प्रकरण; तक्रारदार अधिकारी क्राईम ब्रँचमध्ये हजर

परिवहन भ्रष्टाचार प्रकरण; तक्रारदार अधिकारी क्राईम ब्रँचमध्ये हजर

Subscribe

तक्रारदार कोणते पुरावे सादर करणार याकडे सर्वांचे लक्ष, अधिकाऱ्यांना भरली धडकी

परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह सहा बड्या अधिकाऱ्यांवर ३०० कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या भ्रष्टाचाराची तक्रार करणारे याच विभागातील मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील थोड्या वेळापूर्वी पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रँचमध्ये हजर झाले. येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी सुरू आहे. पाटील कोणते पुरावे सादर करणार या विचाराने अधिकाऱ्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहे.

कोण आहेत तक्रारदार

सध्या नाशिक ‘आरटीओ’त मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले तक्रारदार गजेंद्र पाटील धुळे येथे कार्यरत असताना त्यांनी तत्कालीन आरटीओ तडवी यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून त्या तडवींना लाच घेताना अटक झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. पाटील सध्या नाशिक ‘आरटीओ’त मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असले, तरी त्यांनी निलंबनाच्या कारवाईनंतरच तक्रार का केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

परब खरमाटेंच्या हातातील बाहुले

परिवहन विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर अनिल परब यांनी कारभार पाहण्यासह पैसे गोळा करण्यासाठी वर्धा येथील डेप्युटी आरटीओ बजरंग खरमाटे यांची नेमणूक केली. खरमाटे हे दोनवेळा निलंबित झालेले आहेत. अधिकाऱ्यांच्या तक्रारी करणे आणि अँटी करप्शनकडून त्या मिटवून घेण्याचे उद्योग खरमाटे करतात. बदल्यांमधून हाती आलेले निम्मे पैसे त्यांनी स्वतःकडे ठेवले, निम्मे परब यांच्याकडे पोहोचवले. शरण न जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे, कारवाई करण्याचे प्रकार ते करतात. या प्रकारांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाहक बदनामी होते आहे. हप्ते वसूलीसाठी विभागीय स्तरावर विशिष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. परब स्वतः खरमाटे यांच्या हातातील बाहुले झाले आहेत. नाशिकचे भरत कळसकर यांना धुळे आणि नाशिकमधून महिन्याकाठी ८५ लाख रुपये, खरमाटे यांना नागपूरमधून महिन्याला २ कोटी, अतुल आदे यांची पिंपरी चिंचवडमधून महिन्याला ५० लाख रुपये वैयक्तिक कमाई असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय नावानिशी राज्यभरातील अधिकारी, त्यांची कमाई, वरदहस्त न लाभलेल्या अधिकाऱ्यांची कोंडी असे अनेक गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आलेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -