घरमहाराष्ट्रSachin Waze : ...तर सचिन वाझे होईल फरार, नजरकैदेत ठेवण्यास NIA चा...

Sachin Waze : …तर सचिन वाझे होईल फरार, नजरकैदेत ठेवण्यास NIA चा विरोध

Subscribe

मुकेश अंबानी अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणातील आरोपी सचिन वाझेने तळोजा कारागृहातून तात्पुरती बदली करुन नजरकैदेत राहण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र वाझेला नजरकैदेत ठेवण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA)विरोध केला आहे.

सचिन वाझेनं ह्रदयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर पूर्णपणे बरं वाटेपर्यंत आपल्याला घरात नजरकैदेत ठेवण्यात यावं अशी मागणी करणारा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर मंगळवारी एनआयएनं मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञापत्रात एनआयएने, वाझेला घरात नजरकैदेत ठेवल्यास तो फरार होऊ शकतो तसेच खटल्यातील साक्षी आणि पुराव्यांशी छेडछाड करु शकतो, असा दावा केला आहे.

- Advertisement -

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एनआयएने असेही म्हटले आहे की, सचिन वाझे व्यापारी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यासह गंभीर गुन्ह्यांतील आरोप आहे, त्यामुळे त्याला नजरकैदेत ठेवण्यास परवानगी देण्यात येऊ नये.

“जर आरोपी वाझेला नजरकैदेत ठेवण्याची परवानगी दिली तर तो फरार होईल आणि कथितरित्या त्याचे सहकारी असलेले संरक्षित साक्षीदार आणि फिर्यादी साक्षीदारांसदर्भात छेडछाड करेल, अशी सर्व शक्यता आहे. या प्रकरणात साक्ष कोण देतयं याचा शोध घेणं वाझेसाठी अवघड नाही. या प्रकरणातील सर्व साक्षीदारांची ओळख आणि पत्ते गोपनीय ठेवले आहेत. परंतु वाझे एक प्रभावशाली अधिकार होता त्याला मुंबईतील सर्व ठिकाणांची माहिती आहे.यामुळे तपासात अडचणी येऊ शकतात, असे एनआयएने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

परंतु वाझेनी नजरकैदेसंदर्भात केलेल्या मागणी याचिकेत ज्याप्रकारे एल्गार प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांना प्रकृतीच्या कारणासाठी वैद्यकीय अंतरिम जामीन मंजूर केला त्याचप्रमाणे आपल्याही जामीन मिळावा अशी मागणी केली होती. मात्र यावर एनआयएने प्रतिज्ञापत्रात म्हटले की, राव यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र वाझे न्यायालयीन कोठडी नजरकैदेच्या स्वरुपात मागत आहे.

मंगळवारी पार पडलेल्या या सुनावणीत न्या. नितीन जामदार आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडापीठाने वाझेचा सविस्तर वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश त्याचे वकील रौनक नाईक आणि कारागृह प्रशानसनाला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी नोव्हेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -