घरदिवाळी २०२१६० वर्षांनंतर आला खरेदीचा महामुहूर्त

६० वर्षांनंतर आला खरेदीचा महामुहूर्त

Subscribe

या वर्षी गुरू पुष्य नक्षत्रात तीन महा संयोग

नाशिक : यंदा दिवाळी ४ नोव्हेंबरला आहे, त्याआधी पुष्य नक्षत्र गुरुवारी २८ ऑक्टोबरला येत आहे. विशेष म्हणजे तब्बल ६० वर्षानंतर हा संयोग तयार होत असून या नक्षत्राला खरेदी आणि गुंतवणुकीचा महामुहूर्त असेही म्हणतात. त्याहूनही आणखी एक विशेष बाब म्हणजे या वर्षी गुरू पुष्य नक्षत्रात तीन महा संयोग तयार होत आहेत. अमृत योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग हे तीन योग तयार होत आहेत. ज्योतिषतज्ज्ञांच्या मतानुसार, हा महासंयोग हा क्वचितच तयार होतो. त्यामुळे यंदाच्या वर्षी दिवाळीच्या खरेदीसाठीचे शुभमुहूर्त खूपच खास असणार आहेत.

ज्योतिषतज्ज्ञांच्या मते हा योग ६० वर्षांपूर्वी तयार झाला होता: यापूर्वी बरोबर ६० वर्षापूर्वी १९६१ मध्ये पुष्य नक्षत्रचे स्वामी गुरू आणि उपस्वामी शनीची मकर राशीत युती घडली होती. त्यानंतर यंदाच्या वर्षी हा खास संयोग जुळून येत आहे. २८ ऑक्टोबरला पुष्य नक्षत्राच्या दिवशी मकर राशीत शनि-गुरूची युती होणार आहे. या युतीमुळे पुष्य नक्षत्राची शुभता आणखी वाढणार आहे. त्याच दिवशी सकाळी ६.३३ ते ९.४२ पर्यंत सर्वार्थसिद्धी योग असणार आहे. त्यामुळे या काळात दिवाळीची खरेदी केल्यास हा योग अधिक फायदेशीर असणार आहे, असे ज्योतिषांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर दिवसभर रवियोगही असणार आहे. या दिवशी कोणतीही खरेदी करायल तर ती शुभ असणार आहे. प्रॉपर्टी, फर्निचर, लाकडापासून बनविलेल्या वस्तूंची खरेदी शुभ ठरणार आहे. गुरु-पुष्य योगाबरोबरच २८ ऑक्टोबर रोजी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग देखील तयार होत आहेत. या योगांमध्ये केलेली सर्व कामे सिद्ध होतात. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.४२ पासून अमृत सिद्धी योग सुरू होईल, तर सर्वथा सिद्धी योग दिवसभर चालू राहील, असे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात.

का केली जाते सोने अन वाहनांची खरेदी?

गुरु ग्रह हा पिवळ्या वस्तूंचा कारक आहे, तर शनि ग्रह हा लोहाचा कारक आहे. त्यामुळे गुरु पुष्य नक्षत्रात सोन्याच्या वस्तू आणि वाहने खरेदी करण्यावर भर असतो. तसेच या दिवशी घर, प्लॉट, फ्लॅट किंवा दुकान बुक करणं शुभ मानले जाते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -