Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र 'साहेब, आम्हा शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्त करा ओ', बीएलओंची आर्त हाक

‘साहेब, आम्हा शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्त करा ओ’, बीएलओंची आर्त हाक

Subscribe

नाशिक : प्राथमिक शिक्षकांना सातत्याने शैक्षणिक कामाचा ताण वाढत असल्याने याबाबत शासन आणि लोकप्रतिनिधी शिक्षण विभाग सातत्याने दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करावे अशी मागणी शिक्षक संघटनांनी निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्याकडे केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात बीएलआेंची बैठक आयोजीत करण्यात आली होती यावेळी शिक्षकांनी आपल्या अडचणी मांडल्या. शिक्षण विभागाचे उपक्रम कुटुंब सर्वेक्षण, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध, भारत साक्षरता कार्यक्रम, शाळा पूर्व परीक्षा तयारी जनजागृती , संस्था अंतर्गत उपक्रम, सतत गैरहजर विद्यार्थ्यांच्या गृहभेटी देणे,आधार कार्ड काढणे व अपडेट करणे, शिष्यवृत्ती बँक खाते उघडणे, सेतू अभ्यास इत्यादी दैनंदिन अध्यापनानंतर ही कामे शिक्षकांना करावी लागतात. शाळेतील शिक्षक संख्या यांचा विचार करून कमीत कमी 10 टक्के, जास्तीत जास्त २० टक्के च्या पलीकडे शिक्षक घेऊ नये असे शासनाचे व निवडणूक विभागाचे संकेत असताना सुद्धा असे होताना दिसत नाही. ७० ते ८० टक्के प्राथमिक शिक्षकांना ऑर्डर काढण्यात येतात.

- Advertisement -

निवडणूक विभागाने शालेय वेळेनंतर सुट्टीच्या दिवशी सदरची कामे करण्यात यावी असे वारंवार निवडणुक अधिकारी सांगतात परंतु तसे दिसून येत नाही. वारंवार शालेय वेळेत साहित्य घेणे,जमा करणे, बैठक घेणे, हे निवडणूक विभागातील कर्मचारी त्यांच्या सोयीने करीत असतात. शिक्षक वेळेत उपस्थित न झाल्यास निवडणूक संहितेचा धाक दाखवून शिक्षकांना वारंवार फोन करून कार्यवाहीचा बडगा दाखविण्याचा सातत्याने प्रयोग केला जातो. यामुळे शिक्षक सातत्याने तणावाखाली असतो. बीएलओ नेमणूक करताना वारंवार त्याच शिक्षकांना काम करावे लागते. तीन ते पाच वर्षानंतर त्याच शिक्षकांना देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली.

न्यायालयात गेलेल्या शिक्षकांना आपल्या कार्यालयाकडून कामकाजाबाबत विचारणा व नोटीसा अशा अनेक बाबींचा वापर करून दबाव येत असतो. न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत त्या शिक्षकांना बीएलओच्या कामकाजाबाबत विचारणा होऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात समन्वयाने मार्ग काढू असे आश्वासन निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. मंगरूळे यांनी दिले. सदर बैठकीस खाजगी प्राथमिक महासंघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष नंदलाल धांडे यांनी वरील अडचणी व पर्यायी मार्गही सुचविले. बैठकीस जिल्हा सचिव सुनील बिरारी, प्राथमिक शिक्षक संघ मिलिंद गांगुर्डे, सल्लागार धनराज वाणी, बाजीराव सोनवणे, सरचिटणीस निवृत्ति नाठे, प्रदीप पेखळे, शिक्षक भारती संजय पगार, जिल्हाध्यक्ष बोरसे, शिक्षक समिती आनंदा कांदळकर, प्रकाश अहिरे कार्यालयातील नायब तहसीलदार राजेश अहिरे, अव्वल कारकून दिनेश वाघ आदी उपस्थित होते.

खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना बीएलओ कामातून वगळावे. विद्यार्थ्यांना अध्यापनाचे पूर्ण वेळ कामकाज शिक्षकांना करू द्यावे. ज्यांच्यासाठी त्यांची नेमणूक आहे .तेच काम करू द्यावे .अशैक्षणिक कामाचा भार वाढल्याने नाईलाजास्तव शिक्षकांना आंदोलन निवेदन द्यावी लागतात. शासन स्तरावर त्याचा कोणताही परिणाम अथवा दखल घेत नसल्याने शिक्षकांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतात. : नंदलाल धांडे, अध्यक्ष खाजगी प्राथमिक महासंघ नाशिक जिल्हा.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -