घरमहाराष्ट्रनाशिकसाईमंदिर रात्रभर राहणार खुले; दर तासाला २०हजार भाविक घेऊ शकतील दर्शन

साईमंदिर रात्रभर राहणार खुले; दर तासाला २०हजार भाविक घेऊ शकतील दर्शन

Subscribe

अहमदनगर : साईबाबांचे दर्शन घेऊन सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश- विदेशातून शिर्डीत किमान ५ लाख भाविक येण्याचा अंदाज संस्थानने वर्तवला आहे. भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी संस्थानने मंदिर शनिवार, ३१ डिसेंबरला रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दर अर्ध्या तासाला १० हजार भाविकांच्या दर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे.

साईबाबा संस्थानने ८० हजार भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्त निवासातील २८०० खोल्यांसह शहरातील हॉटेलमधील खोल्यांचेही ८० टक्के ऑनलाइन बुकिंग झाले आहे. दीड लाख भाविकांना मोफत भोजन मिळणार आहे. प्रसादासाठी ३५० क्विंटल मोतीचूर बुंदी लाडूंची पाकिटेही तयार केली आहेत. दर अर्ध्या तासाला सुमारे १० हजार भाविक याप्रमाणे ३१ डिसेंबरच्या सूर्यास्तापासून तर सूर्योदयापर्यंत सुमारे २.५० लाख तर दिवसभरात २.५० लाख भाविकांच्या दर्शनासाठी यंत्रणेने तयारी पूर्ण केली आहे. दीड लाख भाविकांसाठी मोफत भोजन, प्रसादासाठी ३५० क्विंटल मोतीचूर बुंदी लाडू, संस्थानचे नियोजन करण्यात आले आहे. दर्शन रांगेत कॉफी, दूध, प्रथमोपचार केंद्रही असणार आहे.

- Advertisement -

दर्शन रांगेत भाविकांना चहा, कॉफी, दूध देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांग, भक्तनिवास, प्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्र आहेत. सुरक्षिततेसाठी १ पोलिस निरीक्षक, ६ उपनिरीक्षक, ७५ पोलिस कर्मचारी, १ शीघ्र कृतीदल पथक, १ बॉम्ब शोधपथक तसेच अतिरिक्त ४ पोलिस निरीक्षक, २२ सहाय्यक निरीक्षक, २५० पुरूष पोलिस, ६० महिला पोलिस याव्यतिरिक्त संस्थानचे १ पोलिस निरीक्षक व ९३० सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले.

संस्थानच्या भक्त निवासातील २८०० खोल्यांत सुमारे २० हजार भाविकांची व्यवस्था. शहरातील सुमारे एक हजार हॉटेलमध्ये ५० हजार भाविक राहू शकतील. संस्थानकडून विविध ठिकाणी तात्पुरत्या व्यवस्थेसाठी २८ हजार चौरस फुटांचे मंडप टाकले आहेत. तेथे १० हजार भाविकांसाठी गादी, ब्लँकेट आणि स्नानगृहाची व्यवस्था केली आहे. उर्वरित ४ लाख २० हजार भाविकांना दर्शन घेऊन पुन्हा परतीचा प्रवास करावा लागेल. शिर्डी येणारी भाविकांच्या वाहनांची संख्या विचारात घेता यंदा कोपरगावकडून नगरच्या दिशेने आणि नगरकडून कोपरगावच्या दिशेने जाणारी वाहने शिर्डी बाह्यवळण रस्त्याने वळवण्यात आली आहे. शहरात फक्त भाविकांचीच वाहने येतील याचे नियोजन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिर्डीत ३१ डिसेंबरच्या रात्री व १ जानेवारीला सरासरी २० हजार भाविकांची वाहने येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

खासगी पार्किंगची क्षमता फक्त १००० हजार वाहनांची असल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागेल. रस्त्यावरील पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होणार असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे. ३१ तारखेला भोजन प्रसाद सकाळी ९.३० पासून रात्री ११.३० पर्यंत सुरू राहील. सुमारे दीड लाख भाविकांना भोजन मिळू शकेल. भोजनात नियमितपणे एक कडधान्याची पातळ भाजी, एक पालेभाजी, दाळ- भात, शिरा, चपाती असा मेन्यू असेल. तसेच भक्तनिवासातही श्री साई संस्थानाच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -