घरताज्या घडामोडीएसटी कर्मचाऱ्यांचा पगार 24 तासांत होण्याची शक्यता, सरकारकडून 350 कोटींचा निधी

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार 24 तासांत होण्याची शक्यता, सरकारकडून 350 कोटींचा निधी

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अद्यापही रखडलेला आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांचा पगार येत्या 24 तासांत होण्याची शक्यता आहे. तसेच सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 350 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तारीख उलटून गेल्यानंतरही पगार न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एसटी महामंडळासाठी दरमहा 360 कोटी रुपये पगारासाठी देण्याचे सरकारने कोर्टामध्ये मान्य केले होते. परंतु मागील काही दिवसांपासून अपुरा निधी सरकारकडून दिला जात असल्याचं समोर आलं आहे.

मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासोबत आज मंत्रालयात बैठक होणार आहे. बैठकीमध्ये एसटी महामंडळाकडून मागील सहा महिन्यांचा बॅकलॉग भरण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. याबाबत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या बैठकीला परिवहन विभागाच्या आयुक्त एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

अर्थ विभागाकडून एसटी महामंडळाला आधी दिलेल्या रकमेचा हिशोब देण्यास सांगितले आहे. एसटी आंदोलनावेळी दर महिन्याला 7 ते 10 तारखेमध्ये पगार करण्याचे आश्वासन सरकारने कोर्टात दिले होते. मात्र दर महिन्यात पगाराला उशीर होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे.


हेही वाचा : राहुल कलाटेंना वंचितचा पाठिंबा, मविआला सुरुवातीलाच धक्का?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -