घरमहाराष्ट्र'थेट भेटी'तून सलील कुलकर्णी यांनी उलगडला आठवणींचा प्रवास

‘थेट भेटी’तून सलील कुलकर्णी यांनी उलगडला आठवणींचा प्रवास

Subscribe

डोंबिवलीमध्ये थेट भेट या कार्यक्रमाच्या माध्यमातून सलील कुलकर्णी यांच्या २० हुन अधिक वर्षांच्या करकीर्दीमधील आठवणींना उजाळा देण्यात आला.

डोंबिवलीमध्ये थेट भेट या कार्यक्रमाच्या माध्यमातून सलील कुलकर्णी यांच्या २० हुन अधिक वर्षांच्या करकीर्दीमधील आठवणींना उजाळा देण्यात आला. मधुमालती एंटरप्रायझेझ ,अभिव्यक्ती फाउंडेशन , मुक्तछंद क्रिएशन्स या संस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वेश हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. सौरभ सोहोनी याने सलील यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या अपूर्वा प्रभू यांनी महिला दिनाला जी टी हाँस्पिटलमध्ये रांगोळी काढून सलील कुलकर्णी यांचे नसतेस घरी तू जेव्हा हे गाणे त्याबरोबर लिहिले होते. त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून सलील कुलकर्णी यांनी हे गीत सादर करून त्यांची आठवण जागवली.

हेच खऱ्या कलाकाराचं लक्षण

सहज सोपं लिहीणं कठीण असतं, जड आणि अलंकारिक लिहिणं सोपं असतं असं यावेळी सलील कुलकर्णी यांनी म्हटले. कवितेचं गाणं होताना आठवणीही त्यांनी यावेळी उपस्थितीत असलेल्या रसिकांसोबत शेअर केल्या. विंदा, शांताबाई शेळके, सुधीर मोघे, ग्रेस, कुसुमाग्रज अशाअनेक कवींच्या कविता आणि गाणी त्याने यावेळेस सादर केल्यात. वेडिंग चा शिनेमा याविषयी त्याने श्रोत्यांना त्याची संकल्पना आणि त्यासाठी केलेला अभ्यास याविषयी सांगितलं. तब्बल ३० चित्रपटांचा अभ्यास करून मग लिखाणाला सुरुवात केल्याचं त्याने आवर्जून सांगितलं. याचबरोबर लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या आठवणी त्याने सांगितल्या. हृदयनाथ यांनी त्याची एक रचना लतादीदींना गुणगुणून दाखवली आणि त्यांनी ती रचना गायची इच्छा व्यक्त केली. वयाच्या ८४व्या वर्षी उभं राहून गायचं आणि त्यातही तुमचं समाधान होई पर्यंत तुम्ही सांगा असं म्हणणं हेच खऱ्या कलाकाराचं लक्षण आहे. डोंबिवलीमध्ये सादरीकरण करायला आल्यावर घरी आल्यासारख वाटत आणि रसिकांसमोर वेगवेगळं सादरीकरण करता येत अस सांगत त्याने रसिकांचं कौतुक केलं.

- Advertisement -

पु.ल. खरे रसिक

पुलं आणि सुनीताबाई यांच्यासमोर बसून तब्बल तास दीड तास बालगीतं सादर करण्याचा अनुभव सलील कुलकर्णी यांना आला. तो अनुभव विलक्षण होता असं देखील सलीलने यावेळी सांगितलं. पुलं हे खऱ्या अर्थाने रसिक होते. दोन थोर प्रेक्षकांसमोर बसून त्यांच्याच घरी सादर करण्याची संधी मला लाभल्याने भाग्यवान समजतो असं सलील यावेळी म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -