घरमुंबईव्याजाच्या पैशातून ज्यूस सेंटर मालकावर प्राणघातक हल्ला

व्याजाच्या पैशातून ज्यूस सेंटर मालकावर प्राणघातक हल्ला

Subscribe

उल्हासनगरमध्ये एका ज्यूस सेंटरच्या मालकावर दोन इसमांनी दि.१६ शनिवारी रात्रीच्या सुमारास केला प्राणघातक हल्ला केला .

एका ज्यूस सेंटरच्या मालकावर दोन इसमानी दि.१६ रोजी शनिवारच्या रात्री प्राणघातक हल्ला केला. या हल्लाचा मुख्य आरोपीचे नाव रोशन माखीजा असे आहे. हा प्राणघातक हल्ला व्याजाने पैसे देण्याच्या व्यवहारामुळे झाला आहे. रोशनने व त्याच्या साथीदाराने हा हल्ला असून त्यांच्यावर या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगरमधील अमन टॉकीज रोड याठिकाणी हा हल्ला झाला आहे.

पैसे देत नसल्यामुळे केला हल्ला

पवन उर्फ जीत गुप्ता यांचे निर्मला ज्यूस सेंटर आहे. पवन याने रोशन माखीजा याच्याकडून काही दिवसांपूर्वी व्याजावर एक लाख रुपये घेतले होते. ते परत करण्यासाठी रोशन माखीजा यांनी पवन याच्याकडे तगादा लावला होता. रोशन माखीजाकडे पवनचे धनादेश असल्याने ते परत केल्यावर तुला पैसे देतो, असे पवन याने सांगितले होते. मात्र, पवन आपले पैसे परत करत नसल्याचा राग मनात धरून रोशन माखिजा आणि त्याच्या साथीदाराने मिळून आपल्याकडील तीक्ष्ण हत्यारांचा वापर करून पवनवर जीवघेणा हल्ला केला.

- Advertisement -

आरोपींवर गुन्हा दाखल

पाठीवर आणि पोटावर हल्ला झाल्यामध्ये जखमी झालेल्या पवनची प्रकृती चिंताजनक असून त्याला भोसले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी ३६ पेक्षा अधिक टाके मारल्याचे सांगितले आहे. रोशन माखीजा हा टीम ओमी कलानीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप पवन याने केला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात भादवी कलम ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पाटीवर आणि पोटावर केलेला घाव अधिक खीळ असल्यामुळे भादवी ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचे पवनच्या पत्नीने सांगितले. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त धुला ठेले यांनी सांगितले कि, डॉक्टरांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कलम वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -