घरताज्या घडामोडी'आमचा बंद शिवसेनेच्या नाही तर राऊतांच्या विरोधात' - संभाजी भिडे

‘आमचा बंद शिवसेनेच्या नाही तर राऊतांच्या विरोधात’ – संभाजी भिडे

Subscribe

छत्रपती उदयनराजे यांना शिवरायांचे वशंज असल्याचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊत यांच्याविरोधात आज शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी सांगली बंदची हाक दिली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा बंद मागे घेण्याची मागणी भिडे यांच्याकडे केली. त्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, “छत्रपतींकडे पुरावे मागणारे अश्लाघ्य वक्तव्य राऊत यांनी केले आहे. आमचा हा बंद शिवसेनेच्या विरोधात नाही. शिवसेनेचे काम संबंध देशभर पसरले आहे. पण एखादा नेता बेताल वक्तव्य करत असेल. तर उद्धव ठाकरेंसारख्या चाणाक्ष व्यक्तीने समाजस्वास्थ बिघडवणाऱ्या अशा व्यक्तिला तात्काळ पदावरून दूर केले पाहीजे. या मागणीसाठी आमचा बंद आहे.”

शिवसेना विवेकी, त्यांचा बंदला विरोध नाही

शिवसेनेचा बंदला विरोध असल्याचा प्रश्न पत्रकारांनी संभाजी भिडे यांना विचारल्यानंतर भिडे यांनी शिवसेनेचे मात्र कौतुक केले. “शिवसेना छत्रपतींचे कार्य करत आहे. मात्र कुणी काही बोलून छत्रपतींच्या परंपरेला गालबोट लावत असेल तर शिवसेनेने कारवाई करावी. आपण पिंडीला पाय लावून झोपत नाही. राऊत यांनी पिंडीला पाय लावण्याचे पाप केले आहे. शिवसेना विवेकी आहेत, ते आमच्या बंदला विरोध करणार नाहीत.”, अशी प्रतिक्रिया भिडे यांनी दिली.

- Advertisement -

सांगलीचा बंद हे षडयंत्र – सुप्रिया सुळे

सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र असल्याचे वाटत आहे. कारण मुख्यमंत्री दौऱ्यावर येणाच्या पार्श्वभूमीवर हा बंद योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. ज्या छत्रपतींनी कष्ट करायला शिकवलं, त्यांच्यासाठी बंद करणे हे मला पटत नाही. तसेच संजय राऊत यांनी इंदिरा गांधीबाबतचे वक्तव्य मागे घेतले आहे. त्यामुळे हा विषय इथेच थांबवून राज्यासमोर जी आव्हाने आहेत, त्याकडे लक्ष दिले पाहीजे, असेही सुळे पुणे येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -