Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र संभाजी भिडेंनी मनोज जरांगेंची भेट घेताच जयंत पाटलांनी लगावला टोला, म्हणाले...

संभाजी भिडेंनी मनोज जरांगेंची भेट घेताच जयंत पाटलांनी लगावला टोला, म्हणाले…

Subscribe

मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याकडून देखील करण्यात आला. यासाठी भिडेंनी आज जरांगे यांची भेट घेतली. परंतु, याच भेटीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देत सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात यावे, यासाठी गेल्या 15 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांनी त्यांचे बेमुदत उपोषण मागे घ्यावे, असा ठराव काल (ता. 11 सप्टेंबर) सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत संमत करण्यात आला. त्याशिवाय जरांगे यांनी किमान एक महिन्याचा वेळ सरकारला द्यावा, अशी मागणी देखील सरकारकडून करण्यात आलेली आहे. जरांगे यांनी त्यांचे बेमुदत उपोषण मागे घ्यावे, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याकडून देखील करण्यात आला. यासाठी भिडेंनी आज जरांगे यांची भेट घेतली. परंतु, याच भेटीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. (Sambhaji Bhide met Manoj Jarang, Jayant Patil criticized Devendra Fadnavis)

हेही वाचा – मनोज जरांगे पाटलांशी अधिकृतपणे चर्चा व्हावी, एजंटच्या माध्यमातून नाही; राऊतांचा राज्य सरकारला टोला

- Advertisement -

मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीबद्दल केलेली विधाने अत्यंत आक्षेपार्ह आहेत. सर्व माध्यमांचे लक्ष केंद्रीत असते, तिथे जाऊन भिडेंनी आपली भूमिका मांडली आहे. देवेंद्र फडणवीसांच्यावतीने तिथे ते गेले नसतील, ही अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीसांनी भिडेंना पाठवले असेल, तर यापूर्वीची त्यांची विधाने फडणवीसांच्या वाट्याला जातील. भिडे स्वत:च गेलेत का? याबाबत फडणवीस स्पष्टीकरण देतील, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सरकारमधील एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली. यावेळी जरांगे यांच्याशी बोलताना भिडे म्हणाले की, तुम्ही मागे वळून पाहायचे नाही, जसे पाहिजे तसे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या निश्चयाने आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही करताय ते अगदी 101 टक्के योग्य करत आहात. जोपर्यंत राजकारण्यांच्या हातात मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, शेवाळावरुन चालण्यासारखे आहे. एक चांगले म्हणजे आता जे राजकारणी सत्तेवर बसलेत, एकनाथ शिंदे अजिबात लबाड नाहीत, देवेंद्र फडणवीस फसवणूक करणार नाहीत, अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले, तरी काळीज असलेला माणूस आहे, असे कौतुक त्यांनी केले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -